कोल्हापूर

जय शिवराय किसान संघटना निवेदन

CD

07252

सामाईक क्षेत्रातील
वीज बिल माफ करा

जय शिवराय किसान संघटनेची मागणी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २७ ः ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज’ योजनेमार्फत शासन ७.५० अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांना वीज बिल माफ केले आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सामाईक वीज जोडणी केली आहे. हे वीज कनेक्शन एकाच शेतकऱ्याच्या नावावर असते. शासनाने सामाईक वीज कनेक्शनचाही या योजनेत समावेश करावा; अशी मागणी जय शिवराय किसान संघटनेतर्फे केली आहे. मागणीचे निवेदन त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना दिले.
निवेदनातील माहितीनुसार, राज्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण ७० टक्के आहे. अशा अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ७.५ अश्वशक्तीपेक्षा जास्त क्षमतेचा पंप बसवलेला असतो. याला पाटबंधारे विभागाची रितसर परवानगी घेतलेली असते. तसेच नदीपासून लांब अंतरावर असणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी अधिक क्षमतेचे पंप बसवून पाणी घेतलेले असते. अशा सामाईक वीज कनेक्शनचा समावेश योजनेत करून अधिक शेतकऱ्यांना वीज बिल माफ योजनेचा लाभ द्यावा. निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, सरपंच राजू मगदूम, गब्बर पाटील, महेश मोहिते, शितल कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: भाडेकरूंना मोठा दिलासा! मालमत्तेचा हिस्सा घेतल्यास घरातून बेदखल करता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Asha Bhosle: नातवाला शेवटचा व्हिडिओ कॉल… नातीच्या बोटात नशीबाची अंगठी घातली; आशा भोसलेंचा अखेरचा क्षण, मुलाने केला खुलासा!

मुंबईच्या खेळाडूंना मिळणार वार्षिक करार! पण रोहित शर्मा, शिवम दुबे, सर्फराज खान अपात्र; MCA कडून वर्षाला किती लाख होते मिळणार?

Jalgaon Heatwave : जळगाव जिल्‍ह्यात उष्णतेची लाट कायम! उन्‍हाच्‍या तीव्र झळा; जिल्‍ह्यातील सर्वच शहरांतील तापमान ४२ अंशांवर

Delhi Airport: दिल्ली विमानतळावर थरारक क्षण! दोन विमानांच्या पंख्याची धडक, काही सेकंदांत वाचले शेकडो जीव

SCROLL FOR NEXT