फुटबॉल फाईल फोटो वापरावा...
...
आंदोलनकर्ते गप्प, समित्या गायब
निवासी फुटबॉल केंद्रांचा प्रश्न कोल्हापूरकरांकडून दुर्लक्षित
सचिन भोसले : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ : एरवी शहराच्या रस्त्यांवर दगड, धोंडे, कचरा, खड्डे पडले तर विविध समित्यांकडून, सामाजिक संघटनांकडून आंदोलनाचे हत्यार उपसले जाते. आंदोलकांच्या रेट्यामुळे शासनाकडून तत्काळ कार्यवाही केली जाते आणि प्रश्न सुटतो, अशी भावना लोकांच्यात आहे. आंदोलनांमध्ये खरी धार असेल तर नक्कीच त्याची दखल घेतली जाते. गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला क्रीडा प्रबोधिनी अंतर्गत निवासी फुटबॉल केंद्रांचा प्रश्न मात्र कोणालाच दिसेनासा झाला आहे. वेळप्रसंगी अगदी राष्ट्र्पतींपासून कोणालाही निवेदन देण्यासाठी भांडणारे आम्ही कोल्हापूरच्या नसानसांत भिनलेल्या या फुटबॉलच्या प्रश्नांवर मात्र गप्प आहोत. माजी आमदार मालोजीराजे तर राष्ट्रीय फुटबॉल संघटनेवर आहेत. मात्र, त्यांच्याकडूनही हा प्रश्न बेदखल झाल्यासारखी स्थिती आहे.
अनेक वर्षे नागरिकांच्या आरोग्याशी, शिक्षणाशी, सार्वजनिक वाहतुकीशी एवढेच काय आयआरबीसारख्या कंपनीने केलेल्या रस्ते वापरात टोल देणारा नाही, अशी एक ना अनेक आंदोलने विविध समित्यांद्वारे झाली. ‘दिसला प्रश्न की कोल्हापुरात आंदोलन’ असा संदेश राज्यभर गेला. या आंदोलनांचे फलित म्हणून सरकारला अनेक चांगले निर्णय घ्यावे लागले. मात्र, कोल्हापूरकरांचा श्वास असलेल्या फुटबॉल पंढरीतून पुण्याला हलविलेल्या क्रीडा प्रबोधिनीअंतर्गत निवासी फुटबॉल केंद्राबाबत सगळीकडे शांतातच पाहावयास मिळत आहे. या शांततेमागचा शोध का घेतला जात नाही, अशी विचारणा आता क्रीडा क्षेत्रातून जाऊ लागली आहे .
निवासी फुटबॉल केंद्र पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी ज्येष्ठ फुटबॉलपटूंनी बाह्या सरसावल्या आहेत. त्याला क्रीडा संघटना, तालमी, फुटबॉल क्लब, आजी-माजी खेळाडू जमेल त्याप्रमाणे पाठिंबाही देत आहेत. गेल्या चाळीस दिवसांहून अधिक काळ ज्येष्ठ फुटबॉलपटू प्रतिक्रिया देऊन एक प्रकारे आंदोलन करीत आहेत. पण, त्यांच्या ताकदीला जर सर्व समित्या, सामाजिक संघटना, नेत्यांची साथ मिळाली तर जनरेट्यापुढे या प्रश्नावर शासनाला हे केंद्र येथे परत सुरू करावे लागेल.
...
क्रीडा संघटानाही गप्प का ?
फुटबॉलशी संबधित क्रीडा संघटनाही या प्रश्नी गप्प आहेत. टोलविरोधी आंदोलन, शालेय कंपनीकरण कायद्याविरोधात आंदोलन, पंचगंगा पुलप्रश्नी आंदोलन, दुधाळीतून सांडपाणी थेट पंचगंगेत या विरोधात आंदोलन, बी-टेन्युअरनी, शिक्षक बदल्या प्रकरण, महापालिका अंतर्गत रस्ते, पाणी, टीपी बांधकाम, करवीर तहसीलमधील बोगस एनए दाखले, शहर वाहतुकीसंबधी आंदोलन, विभागीय क्रीडा संकुलाचे नामकरण आंदोलन, संकुलातील जलतरण तलावाविषयी आंदोलन, शिवाजी स्टेडियम मैदान, जलतरण तलाव फरशा, फिल्टर हाऊस खराब झाल्याप्रश्नी आंदोलन, महापौर कुस्ती स्पर्धेसाठी आंदोलन, शिवाजी विद्यापीठांतर्गत पदक विजेत्या खेळाडूंना मानधन मिळण्याविषयी आंदोलन, अशी एक ना अनेक आंदोलने विविध कृती समित्यांद्वारे झाली आहेत. हॉकी स्टेडियमची जागा वाचली तीही या आंदोलनामुळेच. कोल्हापूरचा श्वास असलेल्या फुटबॉलसाठी मात्र कोणीही पुढे का येत नाही?, असा सवाल उपस्थित होत आहे.
...
‘फुटबॉल आमच्या कोल्हापूरचा श्वास आहे. त्यामुळे संघटनांच्या आंदोलनांची वाट न बघता आम्ही फुटबॉलप्रेमीच यात पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावू.’
- संतोष हराळे, फुटबॉलप्रेमी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.