कोल्हापूर

राधानगरी राजकारण

CD

के.पीं.विरोधात थेट ठाकरेंकडे तक्रारी
राधानगरीचे राजकारण ः ‘बिद्री’, ‘गोकुळ’ बाजार समितीत शिवसेनेला डावलल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः लोकसभेच्या निकालानंतर जिल्ह्यातील राजकीय वारेही फिरू लागल्याचे संकेत मिळत आहेत. त्यातून महायुतीतील घटक पक्ष सोडून महाविकास आघाडीत येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यातूनच राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत ‘महाविकास’मध्ये येण्यास उत्सुक असलेले माजी आमदार के. पी. पाटील यांच्याविरोधात मतदार संघातील शिवसैनिकांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेच तक्रार केली आहे. निनावी पत्राद्वारे केलेल्या या तक्रारीमुळे राधानगरीचे राजकारण आतापासूनच तापू लागले आहे.
या तक्रारीत बिद्री कारखाना, गोकुळ संघ, बाजार समिती निवडणुकीत मतदार संघातील शिवसैनिकांना के. पी. यांनी कसे डावलले, याचा लेखाजोखा मांडून त्यांना पक्षात न घेण्याची विनंती शिवसैनिकांनी केली आहे. पक्षांसोबत गद्दारी केलेल्या आमदार प्रकाश आबिटकर यांच्यावरही या पत्रात टीका करताना त्यांनी के. पी. यांच्यासोबत संगनमताने काही निवडणुकीत कशा घडामोडी केल्या, याचाही लेखाजोखा मांडला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी के. पी. यांना भेटीचे निमंत्रण दिल्याचे समजल्यावरून हे पत्र पाठवण्यात आले. के. पी. यांना दिलेले निमंत्रण ऐकून खूप वाईट वाटल्याचे यात म्हटले आहे. अनेक वर्षांपासून शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आम्ही लढतोय, झगडतोय, अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरतोय, गद्दार यांच्याविरुद्ध संघर्ष करतोय. तर मग आमचा विचार कधी होणार? असा प्रश्‍नही यात विचारला आहे.
पक्ष आदेशाचा गुलाम बनलोय, असे असताना आमच्या वेदना कोण जाणून घेणार? आम्हाला न्याय कोण देणार? खरंच आमची हात जोडून विनंती आहे की उसने आणि उपरे उमेदवार देऊ नका, अशी सादही पत्रात घातली आहे. हरलो तरी चालेल; पण निष्ठावंताला घेऊन लढूया, असे आवानही यात केले आहे.
के. पी. यांनी ‘बिद्री’ कारखान्याच्या निवडणुकीत शिवसेनेला काडीची किंमत दिली नाही. ‘गोकुळ’मध्ये आबिटकर यांच्याशी संगनमत करून शपथा घेऊन एकमेकांचे उमेदवार निवडून आणले. बाजार समितीच्या निवडणुकीमध्येही ते त्यांनी केले. तालुका संघातही त्यांनी शिवसेनेला बाहेर काढले. ‘गोकुळ’, जिल्हा बँकेत स्वतःचा मुलगा, कारखान्याला स्वतः अध्यक्ष, सतेज पाटील हेच आमचे नेते म्हणणाऱ्या के. पी. यांच्यापासून साधव रहावे, असेही यात म्हटले आहे.

चौकट
प्रकाश आबिटकर यांच्यावरही टीका
२०१४ ला के.पीं.चा पराभव करून आबिटकर यांना विजयी केले. २०१९ ला पुन्हा त्यांना चितपट करून दुसऱ्यांदा आबिटकर यांना निवडून दिले. पण, त्यांनी कधीही शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न केला नाही. स्वतःचा विकास केला. शिवसैनिक मात्र उपाशीच आणि उसने उपरे मात्र तुपाशी आहेत, अशा शब्दात आबिटकर यांच्यावरही यात टीका करण्यात आली.
................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT