07523
...
भागीरथी संस्थेतर्फे बावड्यात हळदी-कुंकू
श्रावण सोमवारचे निमित्त : स्पॉट गेमसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम
कोल्हापूर, ता. २७ : श्रावण सोमवारनिमित्त भागीरथी महिला संस्था आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्यावतीने कसबा बावडा येथील उलपे मळ्यात आयोजित हळदी-कुंकू समारंभाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचे आवाहन या कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक यांनी केले. स्री शक्तीला साद घालत, नवे नेतृत्व करण्यासाठी आपण तयार असल्याचे कृष्णराज महाडिक यांनी जाहीर केले.
यावेळी स्पॉट गेमसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी अरुंधती महाडिक यांनी कार्यक्रमाचा हेतू सांगितला. भागीरथी संस्थेच्यावतीने सुरू असलेल्या स्त्री सक्षमीकरण चळवळीत प्रत्येकाने सक्रीय व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर विरोधक नाहक टीका करत आहेत. या योजनेला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे’, असे खासदार महाडिक म्हणाले.
यावेळी उद्योग निरीक्षक शीतल माळी, सचिन पाटणकर यांनी राज्य शासनाच्या महिलांविषयक उद्योग- व्यवसाय योजनांची माहिती दिली. स्पॉट गेममधील विजेत्या महिलांना अरुंधती महाडिक यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यावेळी राजाराम कारखान्याचे संचालक दिलीप उलपे, नारायण चव्हाण, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे, उमा उलपे, धिरज उलपे, रूपाली कुंभार, आशा बेडेकर, संगीता खाडे, शारदा पोटे, संपदा उलपे, अश्विनी पंडत, हेमलता शिंदे, राजश्री उलपे, शरयू बेडेकर यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.