कोल्हापूर

दुधाळी शूटिंग रेंजकडे नेमबाजांची पाठ

CD

08165
कोल्हापूर ः दुधाळी मैदानावरील छत्रपती धर्मवीर संभाजीराजे रायफल प्रशिक्षण केंद्रातील दहा मीटर रेंज बंद अवस्थेत आहे.
.......
08163
कोल्हापूर ः दुधाळी मैदानावरील छत्रपती धर्मवीर संभाजीराजे रायफल नेमबाजी प्रशिक्षण केंद्रातील ५० मीटर रेंजचीही दुरवस्था झाली आहे.
.............
दुधाळी शूटिंग रेंजकडे नेमबाजांची पाठ

धरली खासगीची वाट ः देखभालीसह प्रशिक्षकांच्या मानधनाचा खर्चही भागेना

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः क्रीडानगरीत यशाचा महामेरू ठरलेल्या दुधाळी शूटिंग रेंज अर्थात छत्रपती धर्मवीर संभाजीराजे एअर रायफल नेमबाजी प्रशिक्षण केंद्राची दुरवस्था झाली आहे. खुल्या ५० मीटर रेंजसह आता नव्याने सुरू केलेल्या १० मीटर सुसज्ज रेंजकडेही नेमबाजांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे प्रशिक्षकांच्या मानधनासह देखभाल दुरुस्तीवर होणारा खर्चही निघेनासा झाला आहे.
कोल्हापूरच्या क्रीडा लौकिकात भर घालणाऱ्या या केंद्रातून जयसिंह कुसाळे, रमेश कुसाळे, तेजस्विनी सावंत, राही सरनोबत आदींनी नेमबाजीचे प्रशिक्षण घेतले. या केंद्रावर मानधनावरील प्रशिक्षकांची नेमणूक केली आहे. मात्र, नियमित सरावासाठी एकही नेमबाज या केंद्राकडे फिरकत नाही. त्यात ५० मीटर रेंज खुली आहे. त्यातील टार्गेट मॅन्युअली आहेत, तर नव्याने सव्वा कोटी रुपये खर्चून १० मीटर वातानुकूलित व इलेक्ट्रॉनिक्स टार्गेट असलेली रेंज बांधली आहे.
सुरुवातीचे काही दिवस आणि खासगी प्रशिक्षकांकडे शिकायला असलेले नेमबाज सरावासाठी येत असत. मात्र, कालांतराने या केंद्राकडे या नेमबाजांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे चांगली सुविधा असूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातून देखभाल, दुरुस्तीसह प्रशिक्षकांच्या मानधनाचा खर्चही भागत नाही. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाने नेमबाजांना प्रशिक्षणासाठी या, असे आवाहन केले आहे.
...............
मनपाकडून साडेपाच कोटींचा प्रस्ताव
राज्य, राष्ट्रीय स्पर्धेची तयारी व्हावी, या उद्देशाने सव्वा कोटी रुपये खर्चून १० मीटर इलेक्ट्रॉनिक्स टार्गेटसह केंद्राची सोय केली आहे. याशिवाय नव्याने ५० मीटर, २५ मीटर शूटिंग रेंजसाठी साडेपाच कोटींचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून तयार आहे. या केंद्रावर नियमित सराव आणि प्रशिक्षणासाठी महिन्याकाठी ११०० रुपये शुल्क आकारले जाते. याशिवाय अडीच ते तीन लाखांच्या रायफलचाही प्रस्ताव देण्यात आला आहे.
..........
कोट...
नियमित सरावासाठी एकही नेमबाज येत नाही. राष्ट्रीय स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरच खेळाडू सरावासाठी या रेंजकडे येतात. नियमित सरावाकडे नेमबाजांनी पाठ फिरवली आहे. कमीत कमी खर्चात इतक्या सुविधा उपलब्ध आहेत. त्याचा नवोदितांनी लाभ घ्यावा.
- तेजस कुसाळे, राष्ट्रीय नेमबाज व प्रशिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: दिवसभरात काय घडलं? वाचा सर्व अपडेट्स एका क्लिकवर

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT