‘सुळकूड’प्रश्नी ४ सप्टेंबरला धरणे आंदोलन
मंत्र्यांना पुन्हा गावबंदीचा निर्णय : गणेशोत्सवातून राबविणार जनजागृती मोहीम
इचलकरंजी, ता. ३० : शहरासाठी सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी त्वरित करा, या मागणीसाठी ४ सप्टेंबरला सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत महात्मा गांधी पुतळ्यानजीक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आवाहनामुळे मंत्र्यांना गावबंदी कार्यक्रम समितीने तात्पुरता स्थगित केला होता. तथापि, बैठकीबाबत आश्वासनाची पूर्तता न झाल्याने मंत्र्यांना गावबंदी कार्यक्रम आजपासून पुन्हा लागू केला. गणेशोत्सवातून योजनेबाबत जनजागृती मोहीम राबविण्याचाही निर्णय घेण्यात आला.
सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी करावी, या मागणासाठी कृती समिती सतत आंदोलन करीत आहे. मात्र, शासनस्तरावर अद्याप योजनेला गती मिळालेली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या इचलकरंजी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कृती समितीने काळे झेंडे दाखवत निदर्शने करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली होती. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी कोल्हापूर दौऱ्यावेळी चर्चा केली. त्यामध्ये त्वरित बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. तसे लेखी पत्र जिल्हाधिकारी येडगे यांच्या सूचनेनुसार महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिले होते. त्यामुळे कृती समितीने आठ दिवसांसाठी आंदोलन स्थगित केले होते. मात्र, अद्याप हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे कृती समिती पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. आज तातडीने बैठक घेत धरणे आंदोलनासह पुन्हा मंत्र्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला.
प्रताप होगाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस मदन कारंडे, शशांक बावचकर, पुंडलिक जाधव, सुहास जांभळे, राहुल खंजिरे, सयाजी चव्हाण, अभिजित पटवा, विजय जगताप, बजरंग लोणारी, वसंत कोरवी, जाविद मोमीन, सुषमा साळुंखे, रिटा रॉड्रिग्युस, राजू आलासे, सदा मलाबादे, आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.