राष्ट्रपतींच्या ताफ्यासाठी थांबणार महामार्गावरील वाहतूक
दौऱ्यादिवशी शहरातील प्रमुख एकेरी रस्ते शिथील ः सात मार्गांवर नो पार्कींग झोन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवारी (ता. २) कोल्हापुर दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रपतींच्या वाहनांचा ताफा विमानतळाहून शहरात येताना काही वेळासाठी इतर वाहतून थांबविण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या अंबाबाई दर्शनावेळी शहरातील प्रमुख एकेरी मार्ग शिथील करून या मार्गाने वाहतुकीचे नियोजन केले जाणार आहे. वाहनाचा ताफा जाणाऱ्या ७ मार्गांवर वाहने थांबण्यास मनाई केली आहे.
विमानतळाहून अंबाबाई दर्शनासाठी त्यांचा ताफा येणार आहे. यानंतर वारणानगर कोडोली तेथील नियोजित कार्यक्रमासाठी जाणार आहेत. तिकडून पुन्हा विमानतळ असा प्रवास असल्याने या मार्गावरील वाहतूकीचे नियोजन शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून करण्यात आले आहे.
एकेरी मार्ग शिथील...
राष्ट्रपती मुर्मू अंबाबाई मंदिरात असताना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुर्गा सिग्नल चौक ते देवल क्लब, खरी कॉर्नर ते मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर ते खरी कॉर्नर, मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर हे एकेरी मार्ग शिथील असतील.
नो पार्किंग झोन
विमानतळ, शाहू टोल नाका, केएसबीपी चौक ते ताराराणी चौक, धैर्यप्रसाद चौक, जिल्हाधिकारी कार्यालय चौक, दसरा चौक, बिंदु चौक, मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, अंबाबाई मंदिर या परिसरातील रस्त्यांच्या दोन्ही बाजू नो पार्किंग झोन करण्यात आले आहेत.
चौकट
वळविण्यात आलेले मार्ग
बोरपाडळेकडून वारणा कोडोली जाणारी वाहने कोल्हापूरच्या दिशेने वळविण्यात येईल. कोडोली पोलिस ठाण्यासमोरील पोखले फाटा येथून वाहने पुढे सोडली जाणार नाहीत. वारणा तालीम, माले, दानेवाडी फाटा येथून कोडोलीच्या दिशेने जाणारी वाहतूक पर्यायी मार्गांनी वळविण्यात येणार आहे.
चौकट
महामार्गावरील वाहतूक काही काळ बंद
राष्ट्रपतींच्या वाहनांचा ताफा विमानतळावरून अंबाबाई मंदिराकडे रवाना होताना अथायु हॉस्पिटलसमोर कागलच्या दिशेने जाणारी पुणे- बंगळूर महामार्गावरील वाहतुक काही काळ थांबविण्यात येईल. तसेच वाठार ब्रिजजवळून वारणानगरकडे रवाना होताना लक्ष्मी टेकडी, एचएसपी ऑफिस, हॉटेल स्टायलँड, उचगांव रेल्वचे ब्रिज येथे काही काळ महामार्गा वरील वाहतुक काही काळ थांबविण्यात येईल. वारणानगर येथे होणा-या कार्यक्रमाकरीता वारणा साखर कारखाना गाडी अड्डा येथे पार्कींगची व्यवस्था करण्यात आली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.