फोटो 08217
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची
संजय मंडलिक यांच्यासोबत चर्चा
निवासस्थानी भेट; मतदारसंघात प्रचार सुरू करणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांची रुईकर कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेबाबत त्यांनी चर्चा केली. कागल विधानसभा मतदारसंघात प्रचार सुरू करण्याचे त्यांनी ठरविले.
माजी खासदार प्रा. मंडलिक यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या प्रचाराची यंत्रणा व एकूणच व्यूहरचनेबाबत त्यांच्यामध्ये चर्चा झाली. मतदारसंघामध्ये प्रचाराची सुरुवात कधी करूया, अशी विचारणा पालकमंत्री मुश्रीफ यांनी केली. त्यावर महायुतीचा मी घटक आहे. सध्या मतदारसंघात महायुती सरकारच्या माध्यमातून केलेल्या विविध विकासकामांच्या उद्घाटनाचे कार्यक्रम सुरू आहेत. या कार्यक्रमांसाठी मी उपस्थित राहत आहे. निवडणुकीचे कामकाज सुरू झाले की, प्रचाराची सुरुवात करूया, असे मंडलिक यांनी सांगितले. यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक भैय्या माने, अतुल जोशी आदी प्रमुख उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.