कोल्हापूर

गडहिंग्लजसाठी कार्डियाक अॅम्ब्युलन्स

CD

8225
गडहिंग्लज ः मुश्रीफ फाउंडेशन व राष्ट्रवादीतर्फे गणराया अवॉर्डचे वितरण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते झाले. यावेळी फाउंडेशन व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
............
गडहिंग्लजसाठी कार्डियाक अॅम्ब्युलन्स

मुश्रीफांची घोषणा ः फाउंडेशन व राष्ट्रवादीतर्फे गणराया अवॉर्डचे वितरण

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३० ः ‘हसन मुश्रीफ फाउंडेशनतर्फे गडहिंग्लज नगरपरिषदेसाठी रुग्णवाहिका दिली होती. त्याला बरीच वर्षे झाली. यामुळे फाउंडेशनतर्फेच पुन्हा एक अत्याधुनिक व सुसज्ज कार्डियाक अॅम्ब्युलन्स लवकरच पालिकेला प्रदान करू,’ अशी घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे केली.
हसन मुश्रीफ फाउंडेशन व राष्ट्रवादीतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या गणराया अवॉर्ड वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्याहस्ते विविध मंडळांना गणराया अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. मुश्रीफ म्हणाले, ‘गतवर्षी पोलिसांनी अनेक मंडळांवर आवश्यक नसतानाही दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करू. मंडळांनी डॉल्बी लावू नये. पारंपरिक वाद्यांमध्ये मिरवणुका काढा व उत्सवाचे पावित्र्य राखा. तुमच्या थर्मामीटरमध्ये माझे काम बसत असेल तरच मंडळांनी मला साथ द्यावी. त्यासाठी कोणावरही जबरदस्ती असणार नाही.’
अरविंद बारदेस्कर, किरण म्हेत्री यांची भाषणे झाली. अमर मांगले यांनी मुश्रीफ फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष रामगोंडा पाटील यांनी मंडळांवरील गुन्हे मागे घेण्यासह मंडळांचे गणशोत्सवातील वीज बिले माफ करण्याची मागणी केली. यावेळी किरण कदम, सुरेश कोळकी, महेश सलवादे, उदय पाटील, दीपक कुराडे, संतोष कांबळे, महेश गाडवी, अण्णासाहेब देवगोंडा आदी उपस्थित होते. आशपाक मकानदार यांनी सूत्रसंचालन केले.
....
चौकट...
गणराया अवॉर्ड विजेते
उत्कृष्ट गणेशमूर्ती अवॉर्ड ः संयुक्त पेठ, महालक्ष्मी, काळभैरव, बसवेश्वर तरुण मंडळ. उत्कृष्ठ तांत्रिक देखावा ः आदर्श, न्यू गणेश, आकर्षक फ्रेंडस, गांधीनगर यूथ सर्कल, उत्कृष्ठ सामाजिक कार्य ः भीमराज, युनिव्हर्सल फ्रेंडस सर्कल, विजेता, शिवगर्जना, उत्कृष्ट पर्यावरणपूरक अवॉर्ड ः संभाजी तरुण मंडळ, साई, हाळलक्ष्मी, एकता मंडळ. उत्कृष्ट मिरवणूक ः शिवप्रेमी, आझाद, सम्राट व नदीवेसचा राजा मंडळ. या सर्वांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT