कोल्हापूर

संविधान मंदिरातून विद्यार्थ्यांना कर्तव्ये, अधिकार समजतील : एम. आर. बहिरशेट

CD

फोटो 11809

संविधान मंदिरांतून कर्तव्ये, अधिकार समजतील
एम. आर. बहिरशेट : शिवाजी तंत्र विद्यालयात संविधान मंदिराचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ : राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार व व्यवसाय प्रशिक्षण विभागाने राज्यातील ५३० औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) व १६७ शासकीय तंत्र विद्यालयात संविधान मंदिर स्थापन केले आहे. या माध्यमातून येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संविधानामुळे आपल्याला मिळालेले अधिकार व कर्तव्ये काय? याची माहिती मिळेल, असे शिवाजी तंत्र विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. आर. बहिरशेट यांनी आज येथे केले.
येथील संविधान मंदिराचे उद्‍घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते ऑनलाईन (आभासी पद्धतीने) झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. करवीरचे माजी पंचायत समिती उपसभापती अविनाश पाटील, कुंभी-कासारी कारखाना संचालक के. डी. कांबळे, ॲड. जयदीप घोरपडे, माजी प्राचार्य उमाजी मोरे, माजी मुख्याध्यापक अनिल शिंदे, माजी जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी विलास सोनवणे, फोर व्हिलर असोसिएशनचे साजिद पठाण, फोर व्हिलर मॅकेनिकल असोसिएशनचे असिफ जमादार, टू व्हिलर मॅकेनिकल असोसिएशनचे अमोल सरनाईक, इलेक्ट्रिकल असोसिएशनचे सुनील कचरे, आदी प्रमुख उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘संविधानाची मूल्ये ही सुजान नागरिक घडविणारी आहेत. सर्वांना सोबत घेऊन जाणारे हे संविधान आहे. याची आजच्या तरुण पिढीला माहिती असणे गरजेचे आहे.’ दरम्यान, तंत्र विद्यालयातील विद्यार्थ्यांचा विविध स्पर्धांमध्ये यश मिळविल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तंत्र विद्यालयातील निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.
कृष्णात कांबळे, सुहास देशपांडे, दिनकर डावरे, के. ए. कांबळे, अशोक भाट, एस. पी. चौगले, स्वप्निल पाटील, एस. बी. पाटील, रामेश्‍वर हडवे, अमित माळी, आदी उपस्थित होते. एस. आर. जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT