कोल्हापूर

‘सुटा’ची घटना दुरुस्ती अवाजवी मताने नामंजूर

CD

‘सुटा’ची घटना दुरुस्ती
अवाजवी मताने नामंजूर

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ : शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) घटना दुरुस्तीबाबतचा ठराव आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी अवाजवी मताने नामंजूर केला. अंबाई डिफेन्स येथील संघटनेच्या कार्यालयात सभा झाली.
दोन महिन्यांपासून सुटाच्या घटना दुरुस्तीच्या विषयाची चर्चा रंगली होती. चाळीस वर्षांपूर्वी सुटाच्या घटनेचे शिल्पकार प्रा. संभाजीराव जाधव यांनी सर्वसमावेशक, सर्वंकष, दूरदृष्टीने तयारी केलेली घटना सध्याच्या काही पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी चुकीच्या पद्धतीने दुरुस्त करण्याचा घाट घातला होता. सभासद आणि विश्वस्तांना अंधारात ठेवून मनमानीपणे सुटावर एकहाती कायमस्वरूपी वर्चस्व ठेवण्यासाठी घटना दुरुस्तीचा डाव आखला होता. त्यामुळे याबाबत सुटाचे विश्वस्त आणि मुख्यप्रवर्तक प्रा. एस. जी. पाटील यांनी पाच सप्टेंबर रोजी संघटनेच्या कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन केले होते. सभासदांनी एकत्र येऊन सुटा बचाव संघर्ष समितीची स्थापना केली. त्याद्वारे या घटना दुरुस्ती विरोधात आंदोलनाद्वारे आवाज उठविला. आज संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घटना दुरुस्तीचा ठराव अवाजवी मताने सभासदांनी नामंजूर केला असल्याची माहिती सुटाचे कार्यालयीन कार्यवाह प्रा. डॉ. डी. एन. पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली. दरम्यान, घटना दुरुस्तीचा वादग्रस्त ठराव असल्याने या सभेला सभासद आवर्जून उपस्थित होते.

चौकट
चुकीच्या गोष्टींना विरोध राहणार
घरगुती पद्धतीने संघटनेची घटना दुरुस्ती करण्याचा प्रयत्न काही लोकांनी सुरू केला. त्याविरोधात सुटा बचाव संघर्ष समितीने लढा दिला. त्याला सभासदांनी साथ दिली. त्यांच्या जोरावर आज घटना दुरुस्तीचा ठराव रद्द करण्यात यश मिळाले. संघटनेबाबतच्या चुकीच्या गोष्टी घडत राहिल्या, तर त्याला आमचा विरोध राहणार असल्याची प्रतिक्रिया संघर्ष समितीचे निमंत्रक डॉ. पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Installment : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट; जुलै महिन्याचा निधी जमा, असा चेक करा पेमेंट स्टेटस

MPSC Recruitment 2026 : MPSC चा मोठा निर्णय! औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; पोलिसांच्या चौकशीनंतर फेरपरीक्षेची घोषणा, उमेदवारांना पुन्हा द्यावी लागणार परीक्षा!

Gajanan Devkate: सरकारच्या थकीत बिलांचा बळी, कार्यालयांचे उंबरठे झिजवले पण...; देवकातेंचा हृदयद्रावक अंत, सरकारविरोधात कंत्राटदारांचा संताप

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

SCROLL FOR NEXT