nip1532
nip1535
12010
निपाणी ः अपघातात ट्रकने चिरडल्याने वाहनांची झालेली अवस्था.
nip1534
12005
निपाणी ः ट्रकने कंटेनरला धडक दिल्यानंतर मोटारीवर उलटलेला कंटेनर.
nip1536
12007
निपाणी ः याच अवजड वाहतुकीच्या ट्रकने पाच वाहनांना धडकून भीषण अपघात केला.
तवंदीत भीषण अपघातात तीन ठार, दहा जखमी
ट्रकची दहा वाहनांना धडक; पट्टणकोडोलीच्या एकाचा मृतांत समावेश
निपाणी, ता. १५ : राष्ट्रीय महामार्गावर बेळगाव ते कोल्हापूरदरम्यान निपाणीजवळ असलेल्या तवंदी घाटात ट्रकने आठ वाहनांना भीषण धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघे ठार तर दहांहून अधिक जण जखमी झाले. रविवारी संध्याकाळी सहा वाजता हा अपघात झाला. रात्री उशिरापर्यंत जखमींना विविध ठिकाणी दाखल केले होते. अपघाताचे दृश पाहून मृतांचा व जखमींचा आकडाही वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
संतोष गणपती माने (वय ४५, रा. भोज, ता. निपाणी), मैजबीन महमदहुसेन मकानदार (५८, रा. दर्गाह गल्ली, निपाणी) व दिलदार ताजुद्दीन मुल्ला (६७, रा. पट्टणकोडोली जि. कोल्हापूर) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. यामध्ये संतोष व मैजबीन यांचा जागीच मृत्यू झाला तर दिलदार यांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयालात दाखल केल्यावर मृत्यू झाला. रेखा संजय गाडीवडर (३५, रा. खडकलाट), सानिया मुल्ला (२४ रा. पट्टणकोडोली, जि. कोल्हापूर), परवीन दिलदार मुल्ला (५६, रा. पट्टणकोडोली, जि. कोल्हापूर), श्रेया नेगलुरे (२४, रा. हुबळी), मंजुनाथ दत्तात्रय तेंडुलकर (५२, रा. हावेरी), सुपर्णा नेगलुरे (५८, रा. हुबळी), नफुरा अय्याज शेख (८, रा. कोल्हापूर) अशी जखमींची नावे आहेत. या घटनेत तीन कार, चार ट्रक व एक मोटारसायकल अशा वाहनांचा अपघात झाल्याने आणखी काही जखमींची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळाली नाही.
याबाबत माहिती अशी, बेळगावहून निपाणीच्या दिशेने उताराला अवजड वाहतुकीच्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील वाहनांना जोराची धडक दिली. ट्रकने आधी मोटारसायकलला उडवले. त्यावरील संतोष माने या शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर ट्रक समोरील अन्य वाहनांवर जोरदार आदळत गेला. सुमारे दहा वाहनांना ढकलत ट्रक पुढे गेला. यामध्ये अवजड ट्रकचाही चक्काचूर झाला. ट्रकला व काही मोटारींनाही धडकून हा ट्रक समोरच्या कंटेनरवर आदळला. त्यावर तो कंटेनर एका मोटारीवर उलटला. या घटनेनंतर लोकांनी मोटारीतील लोकांना लागलीच बाहेर काढले. यामध्ये काहीजण गंभीर जखमी होते. त्यांना लागलीच निपाणी व कोल्हापूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. आणखी एका मोटारीतील निपाणीतील एक कुटुंब संकेश्वरहून येत होते. त्यांच्या मोटारीला ट्रक धडकल्याने त्यातील महिला मैजबीन ही जागीच ठार झाली, अन्य काही जण गंभीर जखमी झाले. त्यांनाही लागलीच निपाणी व कोल्हापूरला उपचारासाठी पाठविण्यात आले. तिसऱ्या मोटारीतील जखमींची नावे उशिरापर्यंत समजली नाहीत. दरम्यान, अपघाताला कारणीभूत ठरलेला व अन्य दोन ट्रकांमधील चालकांना कोणतीही दुखापत झालेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.