कोल्हापूर

विज्ञान दृष्टीकोनावर कार्यशाळेला प्रतिसाद

CD

13761

वैज्ञानिक दृष्टी, चिकित्सक विचारांनी
विवेकी समाज घडविणे शक्य : चपलकट्टी

कोल्हापूर, ता. ४ : ‘‘वैज्ञानिक दृष्टी आणि चिकित्सक विचारांनी विवेकी समाज घडविणे शक्य आहे,’’ असे प्रतिपादन पुणे येथील ‘माणूस असा का वागतो?’ पुस्तिकेच्या लेखिका अंजली चिपलकट्टी यांनी केले.
हेरलेतील सेंटर फॉर रेनसॉ रिसर्च ॲन्ड डेव्हलमेंट इनिस्टट्यूटतर्फे कॉलेज युवकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा झाली. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील कायदा, वैद्यक, कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक विज्ञान, मेकॅनिकल इंजिनिअरींग, नॅनो सायन्स, स्ट्रक्चरल इंजिनिअरींग अशा विविध शाखांतील ६० हून अधिक विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभाग नोंदवला.
चिपलकट्टी म्हणाल्या, ‘‘माणसाचा विचार बंदिस्त झाला की, त्याचा व्यवहार संकुचित होतो. ही माणसे धार्मिक कट्टरता आणि अतिरेकी अहंकारी विचारधारेला बळी पडतात; पण वैज्ञानिक प्रवृत्ती आणि चिकित्सक बुद्धीच्या विकासाने माणूस संवेदनशील, विवेकी बनतो. विद्वेषी वातावरणात विवेकी विचार घडविणाऱ्या कार्यशाळेला महत्त्व आहे.’’
कार्यशाळेत वैज्ञानिक वृत्ती आणि चिकित्सक, विचारक्षमता म्हणजे काय? मेंदूचा विकास कसा घडला? परिणामी आज विकसित मेंदूच्या क्षमता काय आहेत? त्यांचा विकास कसा होतो? केला जाऊ शकतो? यावर पहिल्या सत्रात मांडणी झाली. दुसऱ्या सत्रात माणसामध्ये निसर्गतः चिकित्सक प्रवृत्ती आणि विचार करण्याची क्षमता आहे. त्यामुळे माणूस भौतिक गराजांच्या पलिकडे भावनीक आणि आध्यात्मिक अंगानीसुध्दा विचार करतो. यामुळे धर्मविचाराचा विकास कसा झाला? आज संघटित धर्म कसा घडला? त्याचे राजकीय सांस्कृतिक आणि मानवी संबंधावर काय परिणाम होतात? यावर मांडणी झाली. बशीर पठाण, मुन्ना पठाण, मुसा शेख, रेहाना मुरसल, रासीका मुल्ला, डॉ सुरज चौगुले, डॉ. झाकीर सन्दे, मोहम्मद सैफ मुल्ला यांनी आयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT