कोल्हापूर

जिल्ह्यातील सर्वच जागा स्वबळावर लढविणार

CD

जिल्ह्यातील सर्वच जागा
लढविण्याचा निर्णय

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए) चा कार्यकर्ता मेळावा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांत पक्षाचा उमेदवार उभा केला जाईल. याबाबत आज झालेल्या निर्धार मेळाव्यात हा निर्णय एकमताने झाला, अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ओव्हाळ म्हणाले, ‘‘आगामी विधानसभा निवडणुकांबाबत मुंबईत पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी २८८ विधान मतदारसंघांपैकी २०० हून अधिक जागा स्वबळावर लढविण्याची सूचना केली होती. त्यानुसार आज शाहू स्मारक भवनात प्रदेश महिला आघाडी अध्यक्षा सुनीता चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत निर्धार मेळावा झाला. यात दहापैकी दहाही जागांवर पक्षाचे उमेदवार उभे करण्याचा निर्धार केला. कोल्हापूर उत्तरमधून पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्षा रुपाताई वायदंडे व हातकणंगले मतदारसंघातून डॉ. गणेश वाईकर यांची उमेदवारी जाहीर केली. तर पाच विधानसभा मतदारसंघनिहाय प्रभारी व अध्यक्षांची नियुक्ती केली. प्रभारी म्हणून महपती खिल्लारे, अध्यक्ष डॉ. गणेश वाईकर (हातकणंगले), तर प्रभारी डॉ. छाया साठे, अध्यक्ष म्हणून शबाना नदाफ ( इचलकरंजी), कोल्हापूर (दक्षिण) मधून प्रभारी म्हणून शेरू हळदीकर, अध्यक्ष म्हणून विश्‍वास तरटे आणि कोल्हापूर (उत्तर) मधून प्रभारी म्हणून पुष्पा नलवडे, तर अध्यक्ष म्हणून अमर तांदळे व करवीरमधून प्रताप बाबर प्रभारी, तर अध्यक्ष म्हणून सरदार आमशीकर यांचा समावेश आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य संघटक कैलास जोगदंड, सांगली जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विश्‍वास तरटे, शहराध्यक्ष प्रताप बाबर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: मीराबाई चानूची स्वप्नपूर्ती! आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकले पहिले पदक; २८ वर्षांचा भारताचा दुष्काळ संपवला...

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : प्रसूतीदरम्यान नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरवर निलंबनाची कारवाई

SCROLL FOR NEXT