15196
कोल्हापूर : काँग्रेस कमिटीमध्ये सोमवारी झालेल्या बैठीत बोलताना आमदार सतेज पाटील.
राहुल गांधी शुक्रवार,
शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर
कसबा बावड्यात शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवार (ता. ४) आणि शनिवारी (ता. ५) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्याचदिवशी सायंकाळी सहाला कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बहुशस्त्राधारी पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. याचवेळी शहरातील ८१ प्रभागांमध्ये आतिषबाजी केली जाणार आहे.
काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हा दौरा यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी आज येथे केले. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कार्यालयात या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार शाहू महाराज उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, ‘‘गांधी यांचे शुक्रवारी (ता. ४) दुपारी चारला कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. त्यांच्या स्वागतासाठी रोड शो होणार आहे. त्यानंतर कसबा बावडा येथील पुतळ्याचे अनावरण होईल. मूर्तिकार सतीश घारगे यांनी हा पुतळा तयार केला असून तो बहुशस्त्राधारी आहे. यावेळी आमदार जयश्री जाधव, राजूबाबा आवळे, जयंत आसगावकर, मालोजीराजे छत्रपती, राहुल पाटील, गोपाळराव पाटील, सचिन चव्हाण, सुप्रिया साळोखे, शशांक बावचकर, विनायक ऊर्फ अप्पी पाटील, सरलाताई पाटील, सुलोचना नायकवडे, चेतन नरके, कर्णसिंह गायकवाड, तौफिक मुल्लाणी, शशिकांत पाटील-चुयेकर, बयाजी शेळके, भारती पोवार उपस्थित होते.
दरम्यान, श्री. राहुल गांधी शनिवारी सकाळी शाहू समाधी स्थळाला भेट देऊन अभिवादन करतील. त्यानंतर तपोवन मैदानात होणाऱ्या संविधान परिषदेत ते सहभागी होतील. या कार्यक्रमानंतर ते दिल्लीला रवाना होणार आहेत.
एक हजार कलाकार शिवरायांच्या वेशात
कसबा बावडा येथील पॅव्हेलियन मैदानावर शनिवारी (ता. ५) छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित महानाट्य होईल. या कार्यक्रमात दोन हजार कलाकार सहभागी होणार आहेत. एक हजार कलाकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत असतील.
राहुल गांधी यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सद्य:स्थिती पाहता काँग्रेसचे विचार देशाला गरजेचे आहेत. हे विचार पुढे घेऊन गेले पाहिजे. लोकसभा निवडणुकीवेळी सर्वांनी माझ्यासाठी कष्ट घेतले. काँग्रेसची हीच ताकद कायम ठेवली पाहिजे.
- शाहू छत्रपती महाराज, खासदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.