कोल्हापूर

गड- रवळनाथ संस्था

CD

15559
गडहिंग्लज ः रवळनाथतर्फे पालिकेच्या सफाई कामगारांना सुरक्षा किटचे वाटप झाले. यावेळी संजय गायकवाड, व्ही. के. मायदेव, डी. के. मायदेव, संदीप कागवाडे आदी उपस्थित होते.
....
‘रवळनाथ’ची संस्कृती
अनुकरणीय ः गायकवाड

गडहिंग्लज, ता. २ ः ‘रवळनाथ हाउसिंग फायनान्स सोसायटी सहकार क्षेत्रातील ही एक आदर्शवत संस्था आहे. त्यामुळे रवळनाथची सामाजिक उत्तरदायित्वाची संस्कृती इतर संस्थांनीही अनुकरण करण्यासारखी आहे,’ असे गौरवोद्गार पालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी काढले.
येथील श्री रवळनाथ को-ऑप. हाउसिंग फायनान्स सोसायटीतर्फे पालिकेच्या सफाई कामगारांना सुरक्षा किट वाटपप्रसंगी ते बोलत होते. संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. व्ही. के. मायदेव अध्यक्षस्थानी होते. संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम झाला.
गायकवाड म्हणाले, ‘समाजातील आपदग्रस्तांना आपल्या कुटुंबातील सदस्य समजून मदत करण्याचे व्रत रवळनाथने जोपासले आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे.’ मायदेव म्हणाले, ‘सामाजिक उपक्रमात रवळनाथ अग्रेसर आहे. स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत नगरपरिषदेच्या स्वच्छता दूतांचा सन्मान करता आला. ही बाब संस्थेसाठी अभिमानाची आहे.
संचालिका मीना रिंगणे यांनी स्वागत केले. झेप अकॅडमीच्या अधीक्षक गौरी बेळगुद्री यांनी सूत्रसंचालन केले. संचालक डॉ. आर. एस. निळपणकर यांनी आभार मानले. प्रा. विजय आरबोळे, महेश मजती, उमा तोरगल्ली, रेखा पोतदार, संदीप कागवाडे, सीईओ डी. के. मायदेव, नगर अभियंता राजेंद्र गवळी, जल अभियंता अनिल गंदमवाड, आरोग्य निरीक्षक प्रशांत शिवणे आदीसह रवळनाथचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NZ beat SA in SF : दक्षिण आफ्रिका 'Chokers'! न्यूझीलंडचा T20 World Cup फायनलमध्ये प्रवेश, फिन'टॅस्टीक' शतक

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

मुंबईत २ लाख ट्रक चालक-मालक धडकणार, ई-चालान प्रणालीविरोधात उतरणार रस्त्यावर

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune Fraud : मेट्रोसाठी सिमेंट-स्टील पुरवठ्याच्या आमिषाने पावणे चार कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT