पेरणोली येथे घंटागाडीचे उद्घाटन
आजरा ः स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा - २ अंतर्गत पेरणोली (ता. आजरा) येथील ग्रामपंचायतीमध्ये घंटागाडी प्रदान कार्यक्रम झाला. सरपंच प्रियांका जाधव अध्यक्षस्थानी होत्या. आजरा पंचायत समितीचे माजी सभापती उदयराज पवार यांच्या हस्ते घंटागाडीचे उद्घाटन झाले. संजय लोंढे यांच्या हस्ते पूजन झाले. सरपंच जाधव यांच्या हस्ते प्लास्टिकबंदीच्या अनुषंगाने ग्रामस्थांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर गावातील घनकचरा व्यवस्थापनअंतर्गत नाडेफचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला. कार्यक्रमास उपसरपंच संदीप नावलकर, ग्रामपंचायत सदस्य संकेत सावंत, रणजित फगरे, अमोल जाधव, सुषमा मोहीते, रुपाली पाईम, आदींसह अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, बचतगट सीआरपी, बचत गटाचे अध्यक्ष, ग्रामस्थ उपस्थित होते. संदीप चौगले यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.