कोल्हापूर

उन्मेष उत्साहाचा, सांस्कृतिक वारसा जपण्याचा

CD

15994
आजरा ः येथे शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती युवा महोत्सवात लोकनृत्य सादर करताना कलाकार.
...........
उन्मेष उत्साहाचा, सांस्कृतिक वारसा जपण्याचा

मध्यवर्ती युवा महोत्सव ः आजऱ्यात तरुणाईचा जल्लोषी कलाविष्कार

रणजित कालेकर ः सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ३ ः माणसाची केवळ आर्थिक भूक नसते. सांस्कृतिक व सामाजिकही असते. याचे प्रत्यंतर येथील आजरा महाविद्यालयावर पार पडलेल्या मध्यवर्ती युवा महोत्सवातून दिसून आले. येथे तरुणाईचा जल्लोषी कलाविष्कार पाहावयास मिळाला. बहुविविध सांस्कृतिकतेच्या उन्मेषाचे हे व्यासपीठ ठरले. यानिमित्त शिवाजी विद्यापिठाकडून सांस्कृतिक वारसा जतनाचे प्रयत्न अधोरेखित झाले आहेत.
दरवर्षी होणाऱ्या युवा महोत्सावाचे नेहमीच महाविद्यालयीन तरुणाईला आकर्षण व ओढ असते. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळण्याबरोबर त्यांना व्यक्त होण्याचे हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. यंदा आजऱ्यासारख्या ग्रामीण भागात पहिल्यांदाच ४४ वा मध्यवर्ती युवा महोत्सव होत असल्याने आव्हान मोठे होते, पण हे शिवधनुष्य पेलण्याचे काम येथील संयोजन समितीच्या पुढाकाराने यशस्वी झाले.
या महोत्सवात सुमारे १७० महाविद्यालये व २००० वर विद्यार्थी कलाकार सहभागी झाले होते. प्रत्येक कलाकाराने सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न केला. याला आजरेकर रसिकांकडून चांगली दाद मिळाली. लोकनृत्य, लोकसंगीत, मुकनाट्य, लोककला, लघुनाटिका, शास्त्रीय नृत्य, एकपात्री अभिनय, नकला, शास्त्रीयगायन, नाट्यसंगीत, पाश्चिमात्य व भारतीय समुहगीत, लोकवाद्य व पाश्चिमात्य एकल लोकलवादन,तालवाद्य, सुरवाद्य, सुगम गायन, एकांकिका, वक्तृत्व, प्रश्नमंजूषा, वादविवाद, यासह मेहंदी, कातरकाम, मातीकाम, स्थळ छायाचित्रण अशा विविध ३५ कलाप्रकारांत अनेक कलाकार चमकले.
संयोजकांच्या नेटक्या नियोजनामुळे कलाकारांना सहज व सुखकरपणे कला सादर करता आली. त्याचबरोबर रसिक व कलाप्रेमींना महोत्सव उतमपणे पाहता आला. येथील भोजन, राहणे, वैद्यकीय व्यवस्था उतम होती. कलाकार व त्यांच्यासोबत आलेल्यांनी रामतीर्थ पर्यटनस्थळाबरोबर अन्य पर्यटनस्थळावर जाऊन निसर्ग व पर्यटनाचा आनंद लुटला. सांगली, सातारा व कोल्हापूर येथून महोत्सव पाहण्यासाठी आलेल्यांची संख्या अधिक असल्याने तीन दिवस हॉटेल हाऊसफुल्ल होती.
आजरा तालुक्याला सांस्कृतिक वारसा मोठा आहे. महोत्सवामुळे सांस्कृतिक परिघ विस्तारण्यास एक प्रकारे मदत झाली आहे. पूर्वसुरींकडून आलेला सांस्कृतिक वारसा जतन करण्याबरोबर पुढे नेण्याचे कामही या महोत्सवातून झाले आहे.
...
चौकट
मेघराजाची कृपा
आजरा हे पावसाचे माहेर घर. महोत्सवाच्या कालावधीत तीन दिवस पावसाने उघडीप दिली. त्यामुळे महोत्सव चांगल्या प्रकारे पार पडण्यास मदत झाली. रसिकांनी त्या भरभरून आनंद लुटला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT