आणखी काही प्रतिक्रिया आल्यास देत आहे.
................
आता मराठीचा होईल जगभर सन्मान
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आनंद व्यक्त ः प्रदीर्घ काळाची मागणी पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः केंद्र सरकारने आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आणि प्रदीर्घ काळाची महाराष्ट्राची मागणी पूर्ण झाली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने जगभरातील लोक मराठीकडे वळतील आणि त्यातून ही भाषा आणखी सर्वदूर पोचेल, असा विश्वास आज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला.
....
कोट
ज्या मराठी भाषेत आपण पहिला शब्द बोललो, त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. इतर भाषांतील विविध साहित्य अनुवादित करून मराठीत आणताना आता आणखी अभिमान वाटणार आहे. कारण मराठीचे अभिजातपण सिद्ध झाले आहे आणि आम्हा सर्वांसाठीच ती नक्कीच आनंददायी बाब आहे.
- सोनाली नवांगुळ, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका
....
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याची घटना अतिशय आनंददायी आहे. मराठी भाषेतील विविध उपक्रम राबविण्यासाठी आणि मराठी साहित्य देशभर पोहोचविण्यासाठी सरकारी पाठबळ मिळणार आहे. त्यामुळे मराठी भाषेचा, साहित्यिकांचा देशभर सन्मान होईल.
- डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ
........
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर ती अधिक उपक्रमशील होण्यासाठी योग्य असे पाठबळ मिळणार आहे. मराठी भाषेच्या वाढीसाठी आवश्यक असे उपक्रम सुरू होतील. त्यातून मराठी भाषा विकासाला चालना मिळेल.
- डॉ. नंदकुमार मोरे, मराठी विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ
......
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मराठी भाषेचे प्राचीनत्व, महत्त्व, स्वतंत्रता अधोरेखित झाली आहे. मराठी भाषेचा विकास आणि संवर्धनासाठी हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे. भाषा, संस्कृती, साहित्याविषयी व्यक्तिगत, संस्थात्मक पातळीवर कामे अधिक चांगल्या पद्धतीने होतील.
- डॉ. रणधीर शिंदे, प्राध्यापक, मराठी विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.