16094
कोल्हापूर ः पंचगंगा नदीत तसेच घाटावर सोडलेल्या निर्माल्य व नैवेद्यामुळे परिसर बकाल दिसत होता.
.........
नैवेद्य, निर्माल्याने बनला
पंचगंगा नदी घाट बकाल
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः सर्वपित्री अमावस्येनिमित्त पंचगंगा नदीत मोठ्या प्रमाणावर निर्माल्य व नैवेद्य सोडण्यात आले. त्याचबरोबर प्लास्टिक पिशव्याही टाकल्याने घाटाला बकाल स्वरूप आले होते.
अमावस्येला पाण्यामध्ये नैवद्य सोडण्याच्या प्रथेमुळे अनेकजण नदीत नैवेद्य सोडतात. सर्वपित्री अमावस्येमुळे त्या प्रकारात वाढ झाली होती. घाटाच्या पायऱ्यांवर पूजा करून सोडलेले नैवेद्य व निर्माल्य तसेच होते. पाण्यात सोडलेले नैवेद्यही काठाजवळच राहिल्याने पाण्यात उतरता येत नव्हते. घाटाच्या पायऱ्यांवरून पाण्यात उतरणेही अडचणीचे होत होते. अनेकजण प्लास्टिकच्या पिशवीतून नैवेद्य व निर्माल्य घेऊन आले होते. अनेकांनी त्या पिशव्याही त्यातील साहित्यासह पाण्यात सोडल्या होत्या. त्यामुळे घाटाच्या परिसरात पिशव्या तरंगताना दिसत होत्या. घाटाजवळील काही मंदिरांजवळही निर्माल्याचे तसेच विविध खाद्यपदार्थांचा ढीग पडला होता. या चित्रामुळे पंचगंगा नदीचा घाट बकाल बनला होता. त्याचा उठावही केला नसल्याने स्थिती आणखीनच वाईट बनली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.