कोल्हापूर

इचल : मुख्य अंकासाठी आवश्यक

CD

सौरऊर्जा प्रकल्पासाठी २० टक्के भांडवली अनुदान
वस्त्रोद्योग घटकांसाठी निर्णय; मार्गदर्शक सूचना जारी
इचलकरंजी, ता. ४ ः एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणानुसार राज्यातील वस्त्रोद्योग घटकांना सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी भांडवली अनुदान देण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाने त्या संदर्भातील मार्गदर्शन सूचना अध्यादेशाद्वारे जारी केल्या आहेत. त्यानुसार सौरऊर्जा प्रकल्प किमतीच्या २० टक्के रक्कम अथवा ४ कोटी ८० लाख रुपयांपैकी जे कमी असेल तितके भांडवली अनुदान वस्त्रोद्योग घटकांना मिळणार आहे. मात्र हे भांडवली अनुदान सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर शासनाकडून दिले जाईल.
राज्य शासनाने पाच वर्षांसाठी नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. त्यामध्ये २५ हजार कोटींची गुंतवणूक व ५ लाखांपर्यंत रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट गृहीत धरले आहे. यामध्ये पर्यावरणस्नेही वस्त्रोद्योग घटकांची उभारणी करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. त्यानुसार वस्त्रोद्योग घटकांसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यावर भर दिला जाणार आहे. मुळात वस्त्रोद्योगातील विविध घटकांसाठी विजेवर मोठा खर्च होतो. हा भार कमी करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर केला जाणार आहे. त्यासाठीच सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी शासनाकडून भांडवली अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यासाठी काही निकष शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या अध्यादेशाव्दारे निश्‍चित केले आहेत.
---
अनुदान प्राप्तीसाठी निकष
- सौरऊर्जा प्रकल्पाची नोंदणी महाऊर्जाकडे आवश्यक
- ‘मेडा’कडून प्रकल्प अहवाल व तांत्रिक मंजुरी गरजेची
- भांडवली अनुदानाचे वितरण दोन हप्त्यांत होणार
- प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर ६० टक्के रक्कम वितरित
- याबाबतचा अहवाल महाऊर्जाकडून शासनास जाणे आवश्यक
- उर्वरित ४० टक्के रक्कम वर्षानंतर मिळणार
-अनुदानसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा
- नागपूर वस्त्रोद्योग आयुक्तालयाकडे अर्ज करणे आवश्यक
- पडताळणीनंतर शिफारशीसह प्रस्ताव शासनाकडे जातील
- सात अधिकाऱ्यांची समिती भांडवली अनुदान मंजूर करणार
- समितीची बैठक महिन्याला अथवा आवश्यकतेनुसार होईल.
- समिती शिफारशीनंतर अनुदान वितरण होणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने! सूर्याने सांगितला आम्हाला हवं तेच झालं; Playing XI मध्ये बघा काय बदल झाला

Petrol Diesel Shortage: पेट्रोल, डिझेलची खरंच टंचाई आहे का? केंद्र सरकारकडून आलं स्पष्टीकरण

ललित प्रभाकर–विदुला चौघुलेच्या स्टायलिश लुकची चर्चा! ‘सुट्टा रोल’ पार्टी ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला

Akhil Bharatiya Natya Parishad : घटनेला हरताळ फासून पदे वाटली? नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचा कारभार वादाच्या भोवऱ्यात

Bihar CM: बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ! 'या' ३ कारणांमुळे नितीश कुमार CM पदावरून हटणार; नवं सरकार कधी स्थापन होणार?

SCROLL FOR NEXT