घाटकरवाडीत पावणेचार लाखांची दारू जप्त
गोठा व चारचाकीत केला होता साठा : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
गडहिंग्लज, ता. ५ : घाटकरवाडीत (ता. आजरा) येथे जनावरांचा गोठा व चारचाकी वाहनात बेकायदेशीररित्या साठा केलेली पावणेचार लाख रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी एकास अटक केली आहे. राजाराम आनंदा तांबेकर असे संशयिताचे नाव आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने आज ही कारवाई केली.
घाटकरवाडीत आनंदा तांबेकर याने गोवा बनावटीच्या विदेशी दारूचा साठा करून ठेवल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला समजली. त्यावरून पथकाने छापा टाकला असता तांबेकर याच्या घराशेजारी गोठ्यात व गोठ्याजवळ उभा केलेल्या टाटा सुमो (एमएच ४५, एन ०३८८) या चारचाकीत गोवा बनावटीची विदेशी दारू आढळून आली. त्याची किंमत तीन लाख ७७ हजार ६८० इतकी होते. हा सारा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
निरीक्षक प्रमोद खरात, महेश गायकवाड, भरारी पथकाचे सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक संदीप जाधव, दिवाकर वायदंडे, प्रदीप गुरव, नरेश केरकर, संदीप जानकर, भरत सावंत, संदीप चौगुले, देवेंद्र पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.