राहूल गांधींच्या भेटीने
सनदे कुटुंबिय भारावले
कोल्हापूर, ता. ५ ः खासदार राहुल गांधी यांच्या रूपाने दिवाळीचा आनंद आजच आमच्या घरी आला, मला तर त्यांच्या रूपाने माझा भाऊच आल्याचा भास झाल्याची प्रतिक्रिया अंजना सनदे यांनी व्यक्त केली. राहुल गांधी घरातून निघून गेल्यानंतर हा अनुभव सांगताना सौ. सनदे यांना अश्रू अनावर झाले.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी आज उचगाव (ता. करवीर) येथील अजय सनदे या दलित टेम्पोचालकाच्या घरी अचानक भेट दिली. अनपेक्षितपणे गांधी घरी आल्यानंतर तासभरात सनदे यांच्या घरात जे काही झाले ते सांगताना अंजना यांना आनंदाश्रू अनावर झाले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण व इतर विविध कार्यक्रमांसाठी कोल्हापुरात आलेल्या राहुल गांधी यांनी अचानक सनदे कुटुंबीयांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यामुळे सनदे कुंटुबियांना आश्चर्याचा धक्काच बसला. सुमारे पाऊणतास त्यांनी गप्पा मारल्या, जेवण बनवले व त्यांच्या समवेत खाल्लेही. हा प्रसंग आयुष्यभर विसरू शकणार नाही, अशी भावना अजय सनदे यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.