कोल्हापूर

कष्ट करण्याची तयारी असणाऱ्यांनी आयात-निर्यात उतरावे

CD

फोटो 17661
.......
आयात-निर्यातविषयक उद्योगांत रोजगाराच्या संधी
डॉ. ओंकार माळी; विद्यापीठात समाजशास्त्र अधिविभागातर्फे कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः आयात आणि निर्यातविषयक उद्योगांमध्ये रोजगाराच्या अनेक संधी आहेत. कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या युवकांनी यामध्ये उतरावे, असे आवाहन उद्यमी महाराष्ट्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ओंकार हरी माळी यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाचा समाजशास्त्र अधिविभाग, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस केंद्र आणि शिवाजी युनिव्हर्सिटी रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे आयोजित ‘आयात-निर्यात’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील होते.
डॉ. माळी म्हणाले, ‘आयात-निर्यात व्यवसायाचे उद्योग क्षेत्रात महत्वाचे स्थान आहे. देशासह महाराष्ट्रासोबत स्वतःचा आर्थिक व सामाजिक विकास साधण्यासाठी या क्षेत्रामध्ये तरुणांनी करिअर करण्यासाठी पुढे यावे. त्यासाठी कंपनी रजिस्ट्रेशन, आवश्यक परवाने, टर्म्स पेमेंट-ॲडव्हान्स पेमेंट आदी तांत्रिक बाबींचा योग्य अभ्यास गरजेचा आहे.’
प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी नोकरी व सेवा क्षेत्रापलिकडे चाकोरीबाहेरील उद्योग-व्यवसायांमधील करिअर संधींचा विचार करावा. शिक्षण घेत असतानाच अशा संधींचा शोध घेणे आणि त्यासाठी आवश्यक तयारी करायला हवी.’
डॉ. सागर डेळेकर, प्रकाश राऊत, जगन कराडे, प्रल्हाद माने, राजेंद्र सोनकवडे आदी उपस्थित होते. समाजशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. प्रतिमा पवार यांनी स्वागत केले. मयुरेश पाटील यांनी परिचय करून दिला. आकाश ब्राह्मणे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रतिमा देसाई यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांच्या थेट डोक्याला लावली बंदूक, Z+ सुरक्षा असतानाही घटना; २० वर्षांपासून रचत होता कट

Solapur News: साेलापूरातील ‘त्या’ सात ग्रामसेवकांवर होणार निलंबनाची कारवाई; मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम घेणार निर्णय!

Global Oil Shortage Reasons : सर्वांत मोठा तेलसाठा खुला होणार! ऊर्जासंस्था देणार 40 कोटी बॅरल; वाचा काय आहे 'आयईए'चा प्लॅन?

Farooq Abdullah Attack : फारूख अब्दुल्लांवर हल्ला करणारा कमल सिंग कोण आहे, कशामुळे झाडली गोळी ? सांगितले धक्कादायक कारण

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये शनिवारी हिंदूहित रक्षा मेळावा; मंत्री नीतेश राणे मार्गदर्शन करणार

SCROLL FOR NEXT