17866
दोन दुर्गांचे किडनीदान ठरले दोघांना वरदान
‘अॅस्टर’मध्ये चार गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी
कोल्हापूर, ता ९ : अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दोन वेगवेगळ्या कुटुंबांतील स्त्रियांनी किडनी प्रदान केली आणि या दोन कुटुंबांतील दोन पुरुष रुग्णांना जीवदान मिळाले.
दोन दाम्पत्यांपैकी पुरुष रुग्णांना किडनीची गरज होती; परंतु त्यांच्या स्वतःच्या पत्नीकडून त्या घेणे वैद्यकीय निरीक्षणातून शक्य नव्हते. त्यामुळे एकमेकांच्या पत्नींनी दुसऱ्याच्या पतीला किडनी देणे शक्य आहे हे समजल्यावर सर्वांनी सहमती दर्शविली. चौघांचीही मानसिक तयारी ‘अॅस्टर आधार’च्या संबंधित तज्ज्ञांनी केली. अर्थात त्यांच्यावर पूर्वीपासून येथेच उपचार सुरू होते.
२०१८ मध्ये ॲस्टर आधारमध्ये अशाच झालेल्या यशस्वी शस्त्रक्रियेच्या अनुभवाची शिदोरी किडनी प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. युवराज सावंत व टीमकडे होती. साधारणतः ४५ ते ४६ वर्षांच्या दोन्ही पुरुष रुग्णांना चार वर्षांपासून डायलेसिस उपचार सुरू होते. किडनी प्रत्यारोपण गरजेचे वाटल्याने बरेच दिवस दोनही रुग्ण दात्याच्या प्रतीक्षेत होते, परंतु कुटुंबातील कोणाचीही किडनी त्यांच्या रक्तगटाशी जुळत नव्हती. यावेळी डिजिटल तंत्रज्ञान उपयोगी पडले. रुग्णांचे ठेवलेले डायलेसिसचे जुने अहवाल तज्ज्ञांकडून तपासले गेल्यावर दोनही रुग्णांना एकमेकांच्या पत्नीची किडनी देता येऊ शकते हे सिद्ध झाले. तज्ज्ञांकडून या विशेष शस्त्रक्रियेवर आठ ते दहा महिन्यांपासून अभ्यास सुरू होता. अखेर रुग्णालयामध्ये दोनही स्त्रीदात्यांची किडनी त्यांच्या शरीरातून काढून घेणे व एकमेकांच्या पतीला त्यावेळीच त्यांच्या शरीरात प्रत्यारोपण करणे अशा चार मोठ्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. यामध्ये डॉ. सावंत, डॉ. धनसागर वाकळे, डॉ. अमोल कोडोलीकर, डॉ. संजय देशपांडे, गणेश शिरोळकरसह सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
...
कोट
स्त्रीच्या कर्तृत्वामुळे, तिच्या धाडसामुळे संपूर्ण कुटुंब संकटावर मात करून पुन्हा जिद्दीने उभा राहू शकते हेच यावरून दिसून येते.’’
- डॉ. डॅलन फर्नांडिस
प्रगत तंत्रज्ञान असणारी वैद्यकीय सामग्री, प्रदीर्घ अभ्यास व अनुभवी डॉक्टरांचा समूह, अचूक निदान, त्वरित उपचार या सुविधा रुग्णांना एकाच छताखाली देण्यास अॅस्टर आधार हॉस्पिटल सक्षम आहे हे दिसून येते.
- डॉ. उल्हास दामले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.