कोल्हापूर

जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत डी.सी.नरके विद्यानिकेतनचे यश

CD

जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत
नरके विद्यानिकेतनचे यश

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः जिल्हास्तरीय शासकीय शालेय हॉकी स्पर्धेत १७ वर्षांखालील हॉकी स्पर्धेत डी. सी. नरके विद्यानिकेतनने विजेतेपद पटकाविले.
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे झालेल्या या स्पर्धेत पहिला उपांत्य सामना डी. सी. नरके विद्यानिकेतन व संजीवन विद्यानिकेतन यांच्यात झाला. यात नरके विद्यानिकेतनने हा सामना पाच विरुद्ध शून्य गोलने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य लढतीत नरकेज पन्हाळ पब्लिक स्कूलने दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल, इस्पुर्लीचा दोन विरुद्ध शून्य गोलने पराभव करीत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत नरके विद्यानिकेतनने नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूलचा तीन विरुद्ध शून्य गोलने पराभव करीत विजेतेपद पटकाविले. विजयी संघात राजवर्धन कुंभार, आदर्श नाईक, यश तळेकर, हेमंत पाटील, आदित्य पाटील, दुर्गेश मोळे, केदार पाटील, ओंकार जांभळे, ओम पाटील, शिवराज पाटील, श्रीशांत बांद्रे, अनूज वाकरेकर, अथर्व पाटील, साहिल कुंभार, सत्त्वशील कारंडे, वरद पाटील, प्रितम मोहिते यांचा समावेश होता. या संघाला क्रीडा शिक्षक शिवाजी डूबल, संजय भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्याच्या रिअल लाईफ बाबांनी सगळ्यासमोर केली पोलखोल, डोक्यावर हात मारत म्हणाले...'ही नुसती...'

Music Therapy for Stress Relief: संगीताच्या सहाय्याने तणावमुक्ती; ‘एमएमआर’मध्ये वैदिक ज्ञानावर आधारित अनोखे हेल्थ सेंटर

"आम्हाला, त्याची गरज होती, आम्ही आनंदी..."! पाकड्या अबरारला करारबद्ध करण्याचा SRH कडून बचाव; विसरले, भारताचा केलेला अपमान

LPG Crisis: गॅस टंचाईवर ८० लाख लिटर केरोसीनचा ‘बॅकअप’ प्लॅन तयार, काळाबाजारावर योगींची कारवाई

SCROLL FOR NEXT