कोल्हापूर

वसगडे क्रीडांगणासाठी दोन हेक्टर जागा

CD

वसगडे क्रीडांगणासाठी
दोन हेक्टर जागा मंजूर

आमदार ऋतुराज पाटील, क्रीडांगणाचा होणार विकास

सांगवडेवाडी, ता. ९ ः येथील कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील वसगडे (ता. करवीर) येथे क्रीडांगण विकसासाठी २ हेक्टर ४० आर गायरान जमीन ग्रामपंचायतीला देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. महसूल व वन विभागातर्फे आज हा शासन आदेश जारी केला. याबाबतची माहिती आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. पाठपुराव्याला यश आले असून वसगडेत क्रीडांगण विकसित होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण मतदारसंघातील विविध गावांमध्ये क्रीडांगणे विकसित केली जात आहेत. वसगडेत क्रीडांगण विकसनसाठी जागा नसल्याने गायरानातील जागा मिळण्यासाठी पाठपुरावा केला. ५ मार्च २०२४ रोजी महसूल व वनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र देऊन मागणी केली. त्यानुसार ‘क्रीडांगण'' या सार्वजनिक प्रयोजनासाठी अटी-शर्थीच्या आधीन राहून जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रतिवर्ष १ रुपये नाममात्र दराने १५ वर्षांसाठी भाडेपट्टयाने प्रदान करण्याचा आदेश शासनाने दिला. क्रीडांगण विकासामुळे खेळाडूंची गैरसोय थांबणार असल्याचेही आमदार श्री. पाटील यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ठाणे-मुलुंडदरम्यान नवे रेल्वे स्थानक उभारण्यास मंजुरी; स्टेशनला आनंद दिघेंचे नाव देणार, खासदारांची मागणी

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

जुळून येती रेशीमगाठीनंतर पहिल्यांदा झी मराठीवर दिसणार ललित प्रभाकर, 'या' मालिकेत पहायला मिळणार

Navi Mumbai: मुक्या जीवांना हक्काच्या उपचारांची सुविधा मिळणार, नवी मुंबईत पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू होणार; वाचा सविस्तर

Latest Marathi News Live Update : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT