निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष वातावरणात पार पाडा
जिल्हाधिकारी अमोल येडगे ः राजकीय पक्षांच्या प्रतिनीधींची बैठक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.१० ः विधानसभा निवडणूक निष्पक्ष आणि मुक्त वातावरणात पार पडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमूख राष्ट्रीय, राज्य स्तरावरील राजकीय पक्षांच्या प्रतिनीधींची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, ‘लोकसभा निवडणूक प्रक्रिया नुकतीच झाली. आता विधानसभेसाठी सर्व प्रक्रिया जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात होणार आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी समन्वय ठेवून त्या त्या ठिकाणी निवडणूक अनुषंगिक प्रक्रिया पूर्ण कराव्यात. १० विधानसभा मतदारसंघात मुळ मतदान केंद्राची संख्या ३ हजार ३५९ असून, यामध्ये मतदान केंद्राच्या ठिकाणी बदल केलेली संख्या १०१ आहे, तर मतदान केंद्राच्या नावात बदल केलेली संख्या २९ असून, नवीन मतदान केंद्राची संख्या ९१ आहे. मतदाराचे विलिनीकरण केलेल्या मतदान केंद्राची संख्या १७८ आहे. यानुसार सध्या जिल्ह्यात एकूण ३ हजार ४५० मतदान केंद्र आहेत. उमेदवारांच्या खर्चाबाबत असणाऱ्या दरपत्रकांबाबत काही आक्षेप असल्यास संबंधित पक्षांनी याबाबत लेखी आक्षेप नोंदवावेत. निवडणुकीच्या घोषणेनंतर एक बैठक घेऊन हे दरपत्रक अंतिम करु.’
उपजिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे यांनी प्रास्ताविक केले.अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, वित्त व लेखाधिकारी अतुल आकुर्डे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ हे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.