कोल्हापूर

‘गाळयुक्त शिवार’मधील छदामही नाही

CD

19694
संग्रहित फोटो...
.................
‘गाळयुक्त शिवार’मधील छदामही नाही

योजनेला सहा महिने उलटले ः जिल्ह्यात शंभरहून अधिक शेतकरी प्रतीक्षेत

प्रवीण देसाई ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ : ‘गाळयुक्त शिवार’ योजनेला सहा महिने उलटले तरी गाळ काढलेल्या शेतकऱ्यांना बिलापोटी एक छदामही मिळालेली नाही. जिल्ह्यातील शंभरहून अधिक शेतकरी बिलाच्या प्रतीक्षेत आहेत. पदरमोड करून शेतकऱ्यांनी गाळ काढून नेला. त्यासाठी काहींनी स्वत:ची, तर काहींनी भाड्याची यंत्रसामग्री वापरली. परंतु त्यासाठी सरकारने जाहीर केलेले पैसे खाली झिरपलेले नाहीत. आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने हे ‘भिजत घोंगडे’ पडल्याचे चित्र आहे.
तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात २०१४ पासून ‘जलयुक्त शिवार’ योजना अस्तित्वात आली. त्यानंतर ती व्यापक होऊन ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही नवीन योजना कार्यान्वित झाली. २०१९ नंतर महाविकास आघाडीच्या काळात ही योजना थोडी थंडावली होती. पुन्हा महायुती सरकार आल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी ही योजना पुन्हा सुरू केली. आठवडाभरापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेच्या अनुदानाची रक्कम वाढविण्याचा निर्णय झाला. परंतु प्रश्‍न हा आहे की, ही योजना सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना भाड्यापोटी अनुदान किती मिळाले? तर उत्तर आहे की एक नया रुपयाही नाही.
जिल्ह्यातील जवळपास १०० शेतकऱ्यांनी नदी, नाले, तलावातील गाळ काढून नेला. याबाबतची बिले जलसंधारण विभागाला सादर केली. परंतु आजतागायत बिलाचे पैसे मिळालेले नाहीत. बिलासाठी शेतकऱ्यांकडून जलसंधारण विभागाच्या कार्यालयात दररोज हेलपाटे मारले जात आहेत. परंतु सरकारने अद्याप पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे अनुदानाचे पैसे देता येणार नाहीत, अशी उत्तरे देऊन अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांमधून संतापाचा सूर उमटत आहे. पैसे द्यायचे नसतील तर अशा योजना सुरूच कशाला करता? असा सवालही त्यांच्याकडून उपस्थित होत आहे.
................
कोट...
‘गाळयुक्त शिवार’ योजनेतून गाळ काढण्यासाठी लागणाऱ्या यंत्रणेसाठी सरकारकडून शेतकऱ्यांना बिले मिळणार आहेत. ज्यांनी गाळ काढण्याचे काम केले आहे, त्यांची बिले देण्याबाबत तीन महिन्यांपूर्वी राज्य सरकारकडे निधीची मागणी केली आहे. त्यानंतर याबाबत पाठपुरावाही केला आहे.
- बाळासाहेब आजगेकर, कार्यकारी अभियंता, जलसंधारण विभाग
...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ESIC New Rules 2026 : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! आजारपण आणि प्रसूती लाभांसाठी अर्जाची गरज नाही; पैसे थेट बँक खात्यात जमा होणार

Gadchiroli History: गडचिरोलीच्या घनदाट जंगलात इतिहासाचा खजिना! १६व्या-१७व्या शतकातील ५० वीरगळांचा शोध, शूरवीरांच्या पराक्रमाची शिल्पे उजेडात

IND A vs PAK A: भारत पाकिस्तान सामन्यात टॉसवेळी नेमकं काय घडलं? होत, मॅच रेफ्रींच्या चुकीमुळे वाद, पाकिस्तानी चाहत्यांनी केले आरोप

Water Security 2051 : पुणे महानगर प्रदेशाच्या पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन; जलसंपदा विभागाचा २०५१ पर्यंतचा जलसुरक्षा आराखडा तयार होणार

Palodwadi Robbery: पालोदवाडीत चार चोरट्यांचा धुमाकूळ; चार घरांवर दरोडा, महिलांच्या गळ्याला चाकू लावून ३.३२ लाखांचा ऐवज लुटला

SCROLL FOR NEXT