बिग स्टोरी
नंदिनी नरेवाडी
बालकांचे आर्टचित्र वापरावे.
साडेसात हजार बालकांचे
शासनच बनले पालक
जिल्ह्यातील चित्र; शून्य ते अठरा वयोगटासाठी योजना
ज्या बालकांना आई किंवा वडील नाहीत, त्यांची जबाबदारी एकट्या पालकावर आहे. मुलांना वाढविण्यासारखी आर्थिक परिस्थिती नाही अशा जिल्ह्यातील ७ हजार ५५९ बालकांचे शासनच पालक बनले आहे. या बालकांच्या संगोपनासाठी दर महिन्याला २ हजार २५० रुपये मदत दिली जाते. शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील बालकांना योजनेचा लाभ मिळतो. यामुळे एकल पालकत्व वाट्याला आलेल्या पालकांना आपल्या बालकांचे संगोपन करणे सुसह्य बनले आहे.
.........................
निसर्गाच्या विचित्र फटकाऱ्यात आई किंवा वडिलांना गमवावे लागते. एकट्या आई किंवा वडिलांवर मुलांची जबाबदारी येऊन पडते. बऱ्याचदा मुलांना सांभाळताना नोकरी, व्यवसायाकडे तितकेसे लक्ष देता येत नाही. अशा गरजू पालकांसोबत बालकांच्या संगोपनाची जबाबदारी शासनाने घेतली आहे. यासोबतच बालकाच्या वतीने पालक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय तसेच तालुका पातळीवरील एकात्मिक बालसेवा योजनेचे कनिष्ठ संरक्षक अधिकारी यांच्या कार्यालयात नि:शुल्क अर्ज करू शकतात. अर्ज दाखल झाल्यानंतर बालकल्याण समितीकडून गृहभेट घेतली जाते. तेथे चौकशी केल्यानंतर अर्ज मंजूर केला जातो. तो मुंबईतील आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात येतो. त्यानंतर दर दोन-तीन महिन्यांतून एकदा लाभार्थ्यांच्या खात्यात मदत वर्ग केली जाते.
यासोबतच शासनाने प्रायोजकत्व योजनाही बालकांसाठी सुरू केली आहे. ज्यामध्ये ज्या बालकांचे आई-वडील दोघेही दगावले आहेत, त्या बालकांच्या संगोपनासाठी दर महिन्याला ४ हजार रूपयांची मदत दिली जाते. जिल्ह्यातील सुमारे १ हजार बालकांना ही मदत दिली जाते. शिवाय या पालकांच्या घरी भेट देऊन या बालकांचे पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्ती (उदा. आजी - आजोबा, मावशी, आत्या) नेमून दिल्या जातात. त्यांच्यावर पालकत्वाची जबाबदारी सोपवली जाते. तसेच पालकांची मालमत्ता असल्यास त्यावर वारस म्हणून जिल्हा व विधी सेवा प्राधिकरणाच्या मदतीने बालकांचे नाव चढवले जाते. जेणेकरून १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलांना हक्काची मालमत्ता मिळू शकेल.
----------
चौकट
कोविडमध्ये पालक गमावलेल्या
मुलांच्या नावे १५ लाख
कोविड महामारीत ज्या बालकांनी आई-वडील दोघांनाही गमावले आहे, त्यांसाठीही शासनाने योजना सुरू केली आहे. पीएम केअर योजनेतून या मुलांच्या नावे १० लाख रुपये व राज्य शासनाकडून ५ लाख रुपये असे १५ लाख रुपये पोस्ट खात्यात ठेव केली आहे. या बालकांनाही प्रायोजकत्व योजनेचा लाभ दिला जात असून दर महिन्याला त्यांना ४ हजार रुपये दिले जातात. जिल्ह्यात अशा १४ बालकांना योजनेचा लाभ मिळाला आहे.
----------
कोट
ज्या बालकांची आई परित्यक्ता, घटस्फोटित, विधवा किंवा एकाकी आहे. ज्यांच्याकडे उत्पन्नाचे साधन नाही, तेसुद्धा बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवू शकतात. जिल्हा महिला व बालविकास कार्यालय किंवा तालुका स्तरावरील एकात्मिक बालसेवा योजनेच्या कार्यालयात अर्ज नि:शुल्क आहेत. गरजू पालकांनी योजनेचा लाभ घ्यावा.
- अलोक अग्रहारी, जिल्हा संरक्षण अधिकारी
पालकांविना मुलांचे आयुष्य भरकटले जाऊ नये, त्यांना सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी योजना सुरू असून एकल पालक असणाऱ्या बालकांसाठी २ हजार २५० रुपये, आई-वडील नसलेल्या बालकांना दर महिन्याला ४००० रुपयांची मदत मिळते.
- एस. एन. दाते, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.