बुरुडे मराठी शाळेत
कोजागरी पौर्णिमा
आजरा ः बुरुडे (ता. आजरा) येथील मराठी विद्यामंदिर शाळेत कोजागरी पौर्णिमा उत्साहात साजरी झाली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम कांबळे अध्यक्षस्थानी होते. माजी मंडल कृषी अधिकारी सी. डी. सरदेसाई प्रमुख उपस्थित होते. मुख्याध्यापक मायकेल फर्नांडिस यांनी स्वागत केले. शाळेच्या पटांगणावर शेकोटी पेटविण्यात आली होती. मुख्याध्यापक फर्नांडीस यांनी मुलांना गाणी व नृत्य शिकवले. मुलांनी व पालकांनी मसाले दुधाचा आनंद लुटत पौर्णिमा साजरी केली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अझरुद्दीन बकर, जयवंत कांबळे, अनिल कांबळे, भीमराव कांबळे, सरोजा होन्याळकर यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.