कोल्हापूर

भाजीपाला विकला, संसार सांभाळला

CD

(ह्युमन स्टोरी)

20548

भाजीपाला विकला, संसार सांभाळला

कोगील बुद्रुकमधील अनिता ताकमारे यांची जिद्द; कष्टाची कामगिरी आदर्शवत

संतोष मिठारी ः सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २१ ः कोरोनात सासू-सासऱ्यांचे छत्र हरपले. अपघातात पती दीड वर्ष जायबंद झाले आणि हसतं-खेळतं कुटुंब अडचणीत आले. त्यावर जिद्दीने पुढे येत भाजीपाला विकून संसार सांभाळण्याची जबाबदारी करवीर तालुक्यातील कोगील बुद्रुकमधील अनिता ताकमारे यांनी सांभाळली आहे.
अल्पभूधारक असलेल्या ताकमारे कुटुंबाचा शेती आणि नोकरी करणारे पती मिथुन यांच्या पगारावर अनिता यांचा संसार सुरू होता. चार वर्षांपूर्वी कोरोना आला आणि त्यात सासू-सासऱ्यांच्या निधनाचा पहिला धक्का त्यांना बसला. त्यातून सावरत असताना पती मिथुन यांचा अपघात झाला. त्यामध्ये दीड वर्ष जायबंद झाले. त्यांच्या वैद्यकीय उपचार आणि घरखर्च चालविताना पाच लाखांचे कर्ज झाले. त्याची परतफेड आणि घरखर्च चालविण्याचे त्यांच्यासमोर आव्हान उभे राहिले. त्यावर अनिता यांनी सुरुवातीला दोन म्हशी पाळून दुधावर घरखर्च चालविण्याचा प्रयत्न केला. पण, खर्च भागेना. मग, त्यांनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करण्याचे ठरविले. त्याला पती मिथुन यांनी पाठबळ दिले.
पेठवडगावमधून भाजी आणून त्या गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये विक्री करू लागल्या. त्यातून त्यांना घरखर्च, कर्जाचे हप्ते फेडण्यास चांगली मदत झाली. या व्यवसायाची व्याप्ती वाढविण्यासाठी त्यांनी ॲपे रिक्षा घेतली. त्या स्वतः ही रिक्षा चालवून त्यातून भाजी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. रोज दुपारी बारापर्यंत कणेरी, दत्त कॉलनी, कोगील, व्हन्नूर परिसरात फिरून भाजी विक्री करतात. त्यानंतर पेठवडगावला जाऊन भाजी खरेदी करुन पुन्हा दुपारी चार ते रात्री नऊपर्यंत गोकुळ शिरगाव एमआयडीमध्ये विक्री करतात. चार वर्षांपासून असा त्यांचा दिनक्रम आहे. या व्यवसायाबरोबरच शेती, घरकामही करतात. कष्टातून संसार सांभाळण्याची त्यांची जिद्द आदर्शवत ठरणारी आहे.
........
कमीपणा मानला नाही...
कर्नाटकातील संकेश्वर बाड माहेर असलेल्या अनिता यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. पण, संसाराची जबाबदारी खांद्यावर पडल्यावर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करताना त्यांनी कमीपणा मानला नाही.
..........
कष्ट केल्याचे समाधान
काहीही झाले तरी दुसऱ्याकडे रोजगार करून त्यांच्या बंधनात राहायचे नाही; असे मनात पक्के केले होते. त्यानुसार भाजी विक्रीचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यात राबणूक होती; पण, कष्ट केल्याचे समाधान मिळतेय, अशी प्रतिक्रिया अनिता यांनी व्यक्त केली. या कष्टातून घर-संसार सांभाळला आहे. कर्जाचा भार थोडा हलका झाला आहे. त्याला पतीचेही पाठबळ आहे. मुलाला चांगले शिक्षण देऊन मोठे करणार आहे. स्वतःला कमी समजू नये. जग काय म्हणेल याकडे दुर्लक्ष करून कष्टाला जिद्दीची जोड देऊन प्रामाणिकपणे काम केल्यास नक्की यश मिळते, असा सल्ला त्यांनी महिलांना दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AAY: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! फ्री रेशन योजनेत मोठा बदल; आता 'या' कुटुंबांना प्रत्येकी ७ किलो धान्य मिळणार

अजमल कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकर, 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावेळचा काटा आणणारा पहिला लूक प्रदर्शित

Latest Marathi News Live Update : विलास घुले खुन प्रकरण माजी खासदार प्रीतम मुंडे कुटुंबीयांच्या सांत्वन पर भेटीला

घरच्या घरी मेथी, कोथिंबीर, टोमॅटोची शेती... जुही चावलाने घरातच तयार केलं मिनी फार्म

Kalamb Crime : कळंबमध्ये जुगारविरोधी मोठी कारवाई; ५९ जणांवर गुन्हे, २० लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT