फोटो-KOP24N20676
उद्योजकांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपले
बाबाभाई वसा यांना मान्यवरांकडून आदरांजली; इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये शोकसभा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ ः आम्हा उद्योजकांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपले. उत्साही आणि अभ्यासू उद्योजक कोल्हापूरच्या उद्यमनगरीने गमावला, अशा शब्दांत आज उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी ज्येष्ठ उद्योजक गजेंद्र तथा बाबाभाई वसा यांना आदराजंली वाहिली.
येथील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे शोकसभा घेण्यात आली. बाबाभाई हे दानशूर, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी व्यवसायाबरोबर लोकसंग्रह वाढविला. एका उत्साही उद्योजक कोल्हापूरच्या उद्यमनगरीने गमावला असल्याची भावना इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो कोंडेकर यांनी व्यक्त केली. बाबाभाई यांनी उद्योग क्षेत्राला झळाळी दिली. त्यांच्या कार्याची इतिहासात नक्की नोंद होईल, असे ‘स्मॅक’चे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी सांगितले. बाबाभाई वयाचे बंधन न ठेवता उत्साही मनाने सर्वांशी वागायचे. त्यांनी अनेक कुटुंबीयांना उत्तम मार्गदर्शन करून त्यांची घडी बसवून दिल्याचे उद्योजक सचिन मेनन यांनी सांगितले.
‘मॅक’चे अध्यक्ष मोहन कुशिरे, नितीन वाडीकर, कमलाकांत कुलकर्णी, साजिद हुदली, संजय पेंडसे, प्रदीपभाई कापडिया, एम. वाय. पाटील यांनी आठवणींना उजाळा दिला. प्रसन्न तेरदाळकर, हर्षद दलाल, जयदीप मांगारे, विश्वजित सावंत, हिंदुराव कामते, सुरेश मंडलिक, अशोक जाधव, साधना वसा, मनीषा देसाई, तेजल मेहता, हार्दिका, दीप आणि देविका वसा, कुश, रोहीत, जयराज, किरण आणि गिरीश वसा, प्रदीप व्हरांबळे, प्रशांत मोरे उपस्थित होते.
.........
उद्यमनगरी वाढविली
बाबाभाई म्हणजे कोल्हापूरचे रतन टाटाच होते. इंजिनिअरिंग शिकायला ते नेहमीच मार्गदर्शन करायचे. त्यांनी उद्यमनगरी वाढविण्याचे काम केले असल्याची भावना श्रीकांत दुधाणे यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.