जीएसटी अधिकाऱ्याला
लाचप्रकरणी दोन दिवस कोठडी
कोल्हापूर, ता. २२ ः दंडाची नोटीस न काढण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जीएसटी अधिकारी निवास श्रीपती पाटील (वय ४५, रा. न्यू पॅलेसमागे, नागाळा पार्क, मूळ कोलोली, ता. पन्हाळा) यास एसीबीच्या पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले होते. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
ऑईल आणि ग्रीस रिपॅकिंग कंपनी चालवणारे तक्रारदार यांना जून २०२४ मध्ये कोल्हापूर जीएसटी कार्यालयातून राज्य कर अधिकारी पाटील यांनी नोटीस पाठवली. कंपनीमध्ये २०२०-२१ मध्ये जीएसटी भरलेली कागदपत्रे सादर करा, असे सांगितले होते. तक्रारदारांच्या चुका काढून त्यांना दोन लाखांचा दंड भरावा, अशी भीती दाखवली. तडजोडीने हे प्रकरण आपसात मिटवण्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याचे एसीबीच्या पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.