कोल्हापूर

दिपावली

CD

कर्तव्याचा दीप बनला चैतन्यदायी
आपापल्या सेवा चोख बजावतच केली दिवाळी साजरी

शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ ः नरक चतुर्दशीच्या पहाटेच पावसाच्या सरींनी हजेरी लावली. घराघरांत अभ्यंगस्नान आणि गोडधोड फराळाचा आस्वाद घेतला जाऊ लागला. नेमक्याच याच आनंदाच्या क्षणी घरातील काही कर्ती मंडळी कर्तव्य सांभाळत इतरांच्या दिवाळीचा आनंद सुकर करीत होती. अशा नोकरदार, कष्टकरी वर्गाने लावलेला कर्तव्याचा दीप दिवाळी सणातील चैतन्याचा एक भाग बनला.
दिवाळी सण आपल्या कौटुंबिक वातावरणात साजरा करणे, कर्तव्यावर असल्याने शक्य झाले नाही. त्याची कसलीही नकारात्मक छटा न दाखवता कर्तव्य हाच दिवाळीचा आनंद मानत स्मशानभूमी कर्मचारी, खासगी वैद्यकीय कर्मचारी, माल वाहतूकदार, पेपर विक्रेते, दूध विक्रेते आदी घटकांनी आपापल्या सेवा चोख बजावत इतरांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यास हातभार लावला.
परतीच्या पावसाने काल रात्री खरेदीच्या आनंदावर पाणी फेरले. पाऊस थांबल्यानंतर महाद्वार रोडवरील विक्रेत्यांनी स्टॉल्स पुन्हा मांडले. मध्यरात्रीपर्यंत स्टॉल्सवर ग्राहकांची वर्दळ होती. रात्री दोननंतर विक्रेत्यांनी स्टॉल बंद करून घर गाठले तर काहींनी स्टॉलच्या पसाऱ्यातच शांत झोप घेतली. याच वेळी पोलिसांच्या गस्तीचा राऊंड सुरू झाला. एका गाडीत एक-दोन कॉन्स्टेबल अशा पथकाच्या हद्दीत फेऱ्या सुरू झाल्या. स्टेशन रोडला फिरणाऱ्या गाड्यातील पोलिस रस्त्यावरील संशयितांना हटकत पुढे जात होते. त्याच वेळी शाहूपुरी पहिल्या गल्लीत झालेल्या फटाक्यांच्या आवाजाने दिवाळी सुरू झाल्याची चाहूल दिली. गाडीतच सावध असलेल्या पोलिसचालकाने शेजारी बसलेल्या पोलिस सहकाऱ्याला ‘हॅप्पी दिवाळी’ म्हणत गाडी मार्गस्थ केली.
पुढे मध्यवर्ती बसस्थानकावर एसटी बसेसची ये-जा सुरू होती. एसटीचालक-वाहक यायचे, कॅन्टीनमध्ये बसायचे. एकमेकांना शुभेच्छा देत त्याच कॅन्टीनमधील लाडू एकमेकांना भरवत मार्गस्थ होत होते. दरवर्षी रात्रपाळी करून आलेल्या किंवा मुक्कामी असलेल्या चालक किंवा वाहकांचे अभ्यंगस्नानही येथे झाले. मात्र, पावसामुळे सहकाऱ्यांकडून अभ्यंगस्नान घेण्याचा आनंद मिळाला नाही. चालक-वाहकांनी थंड पाण्याच्या अंघोळी उरकत प्रवाशांचे अभ्यंग स्नान वेळेत होऊ दे, अशी प्रार्थना केली.

चौकट
रुग्णवाहिकांची अशीही धावपळ
सासने मैदानातील अग्निशामक दलाच्या जवानांनी पहाटे उठून चहा पित एकमेकांना शुभेच्छा दिल्या. रात्रीच्या वेळी अत्‍यवस्थ रुग्णांना रुग्णालयात पोहचवण्यासाठी रुग्णवाहिकांची धावपळ सुरू होती. दिवाळी सणाचा घरोघरी आनंद आहे. त्याला धक्का पोहचू नये म्हणून काही रुग्णवाहिकाचालकांनी सायरन न वाजवता फक्त दिवा लावून भरधाव वेगात रुग्ण वाहतूक केली. १०८ रुग्णवाहिकांनी ‘सीपीआर’मध्ये आल्यानंतर रुग्ण दाखल करताच रुग्णवाहिकांचे डॉक्टर, परिचारिका, पायलट यांनी रुग्णालयात असलेल्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goa : पत्नीला वाचवलं, तिच्या बहिणींना वाचवायला गेलेल्या पतीचा अन् ३ बहिणींचा मृत्यू; कुटुंबातल्या चौघांचा अंत

Pune News : पुण्यातील प्रकल्पांची कोंडी फुटणार का? आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाकडून मोठ्या अपेक्षा

बिबटे जेरबंद केले पण खर्च परवडेना, वनतारात पाठवण्याचा प्रस्ताव; एका बिबट्यासाठी दिवसाला किती खर्च येतो?

Gold Rate Today : सोन्याच्या भाव घसरले; या कारणामुळे सोनं-चांदी स्वस्त! काय आहे तुमच्या शहरातील आजचे भाव

Latest Marathi News Update : नाईट क्लब आग प्रकरणी ४ मॅनेजर्सना ६ दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT