कोल्हापूर

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची मुलाखत

CD

महायुतीसोबत जाण्याचा निर्णय
शरद पवारांच्या परवानगीनेच : हसन मुश्रीफ

शरद पवार यांच्या परवानगीनेच आम्ही महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता त्यांनी आम्हाला का नाकारले हे गुलदस्त्यात आहे. माझ्यावर आरोप करणारे समरजितसिंह घाटगे पूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. पण, त्यांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला, अशी टीका पालकमंत्री तथा राष्ठ्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी केली.
- संतोष मिठारी

प्रश्न : सत्ता, मंत्रिपद देऊनही शरद पवार यांची साथ का सोडली?
उत्तर : ज्येष्ठ नेते शरद पवार आमचे दैवत आहेत. यापुढेही राहतील. ३५ वर्षे मी त्यांचा कार्यकर्ता आहे. त्यांनीही मला चांगल्या संधी दिल्या. मात्र, ज्यावेळी नाईलाजाने काही गोष्टी कराव्या लागल्या. त्यावेळी त्यांनी परवानगी दिली. आता नंतर त्यांनी आम्हाला का नाकारले हे गुलदस्त्यात आहे. आता माझ्यावर जे समरजितसिंह घाटगे आरोप करत आहेत ते पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले. त्यांना गुरुदक्षिणा देण्याऐवजी महायुतीचे उमेदवार संजय घाटगे यांच्याविरोधात उभे राहिले. विधानसभेतील पराभवानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. फायदा घेतला आणि आता पुन्हा फडणवीस यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आहे. आता ते निष्ठेच्या गोष्टी करतात याचे आश्चर्य वाटते.?

प्रश्न : सात हजार कोटींच्या निधीचा विकास झाला नसल्याच्या आरोपावर काय सांगाल?
उत्तर : मी मतदारसंघात सात हजार कोटींचा निधी आणला आहे. त्यामुळेच विकासकामांबाबतचे पुस्तक काढण्याचे धाडस केले. जेथे कामे झालेले नाहीत अथवा मंजूर झालेले नाही असा आरोप करणाऱ्या विरोधकांनी त्याबाबतचे पुरावे दाखवावेत. प्रशासकीय मान्यता नसलेले एक काम असेल, तर त्यांनी ते सांगावे.

प्रश्न : आरोग्यसेवेच्या दृष्टीने फार काही केले नसल्याच्या आरोपांबाबत काय सांगाल?
उत्तर : विरोधकांचे हे आरोप बालीश स्वरूपाचे आहेत. हार्ट, लिव्हर, किडनी ट्रान्सप्लांट, ब्रेन, अशा गंभीर आजारांबाबतच्या अद्ययावत सुविधा मुंबईतच आहेत. आता आम्ही अकराशे बेडचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापुरात करत आहोत. सर्वसामान्यांना चांगली वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून मी कार्यरत आहे. सांगावच्या माळावर शंभर बेडचे अद्ययावत हॉस्पिटल उभारत आहे.

प्रश्न : या निवडणुकीत तुमचे गुरूच विरोधात असून, त्याबाबत काय सांगाल?
उत्तर : गुरू जरी माझ्यासोबत नसले, तरी त्यांचा शिष्य म्हणून मी एकलव्याप्रमाणे कार्यरत आहे. मतदारसंघातील विकासकामात सातत्य आणि जनतेशी कायम संपर्क ठेवला आहे. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला मी मदत करतो. माझी दानत चांगली, नियत स्वच्छ आणि लोकांचा आशीर्वाद या त्रिसूत्रीवर मला विश्वास आहे. यावेळी प्रा. संजय मंडलिक, संजय घाटगे यांचा गट माझ्याबरोबर असून, चांगले मताधिक्क्य मिळेल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरणार असून, पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे.

प्रश्न : कागल-गडहिंग्लज-उत्तूर मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन काय आहे?
उत्तर : पंचवीस वर्षांपूर्वी रस्ते, धरणे, पिण्याचे पाणी, आदी सुविधांची अवस्था बिकट होती. मात्र, मी कागल तालुका आणि परिसराला परिपूर्ण केले आहे. साडेसातशे मंदिरांचा जीर्णोद्धार, प्राथमिक शाळा, अंगणवाड्या, ग्रामपंचायत कार्यालय, दलित वस्ती सुधारणा, व्यायामशाळा आदींसाठी निधी दिला आहे. आता पुढील काळात गडहिंग्लज एमआयडीसी परिपूर्ण करणे, उत्तूरला रोजगारवाढीसाठी चांगला प्रकल्प आणणे. आंबेहोळ, नागणवाडी धरणांचे काम पूर्ण केले आहे. कोल्हापुरात आयटी पार्क करण्याचे ध्येय आहे.

प्रश्न : गोडसाखर कारखाना तुम्ही बंद पाडलात या आरोपावर काय सांगाल?
उत्तर : मी तेथे गेलो त्यावेळी कारखाना बंद पडलेला होता. तीन ते चार वर्षे कामगारांना पगार नव्हता. त्याठिकाणी माझ्या मित्राची मी ब्रिस्क कंपनी आणली. आठ वर्षे कारखाना चालविला. मला कारखाना बंद पाडायचा होता, तर त्यांना मदत करायची गरज काय होती?

प्रश्न : ईडीच्या कारवाईला घाबरून आपण महायुतीसमवेत गेलात या टीकेला काय उत्तर द्याल?
उत्तर : माझ्या ईडीच्या चौकशीला हायकोर्टातून स्थगित मिळाली आहे. जे आरोप होते त्यातून पूर्णपणे क्लिन चीट मिळाली आहे. मला घाबरण्याची गरज नाही. परंतु, केंद्र आणि राज्यात एक सरकार असेल, तर मोठा विकास करता येईल, या भावनेने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आम्ही सर्व आमदार महायुतीत सहभागी झालो. पुरोगामी विचार मी सोडलेला नाही. माझ्यावर आरोप करणाऱ्या समरजितसिंह घाटगे यांनी सिद्धनेर्लीत शंभर वर्षांपूर्वी दलित समाजाला दिलेली जमीन काढून घेतली. शाहू दूध संघ आणि त्याच्या अनुदानाबाबत उत्तर देताना ते गप्‍प का बसतात?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT