कोल्हापूर

दक्षिण मतदार राज्यात आदर्श बनवणार

CD

टीका करणाऱ्यांनी विकासकामांची
माहिती घ्यावी ः ऋतुराज पाटील
सुसज्ज शाळा उभारणे व डागडुजी करणे, आरोग्य केंद्र सर्वसोयींनीयुक्त तयार करणे, नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्यासह तरुणांसाठी उद्योग निर्मिती हाच आपला ध्यास आहे. विरोधकांवर टीका करण्यापेक्षा कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ राज्यातील आदर्श मतदारसंघ म्हणून नावारूपाला आणण्यासठी प्रयत्नशील असल्याचे मत आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केले.
- सुनील पाटील

प्रश्‍न : विद्यमान आमदारांचा विकास पोस्टरवरच दिसतो, अशी टीका होते. वस्तुस्थिती काय आहे?
उत्तर : मला कोणावर टीका करत राजकारण करायचे नाही. कोल्हापूरला आणि माझ्या मतदारसंघाला विकासकामात अग्रेसर करण्याची माझी भूमिका आहे. त्यामुळे टीका करणाऱ्यांनीही माझ्या विकासकामांची माहिती घेतल्यास बरे होईल. ज्या-ज्या गावांत विरोधकांनी विरोधातील पोस्टर लावली, त्या गावांत जाऊन त्यांनी माहिती घेतली असती तर त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे त्या-त्या गावांतील लोकांकडूनच मिळाली असती.

प्रश्‍न : मतदारसंघात आत्तापर्यंत कोणती विकासकामे झाली आहेत?
उत्तर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील १४ गावांमध्ये क्रीडांगण आणि त्यासाठी चार कोटी रुपये निधी दिला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी कळंबा परिसरातील मोहिते कॉलनीमध्ये दोन एकर जागेत तीन कोटींचे विरंगुळा केंद्र उभे केले आहे. यामध्ये योगा हॉल, वॉकिंग ट्रॅक, ओपन जीम, ॲम्पी थिएटर, लहान मुलांसाठी प्ले एरिया, अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. दक्षिणमधील १३ गावांसाठी ३४४ कोटींची गांधीनगर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजनेंतर्गत २८ पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम सुरू आहे. उर्वरित २३ गावांसाठी २०४५ पर्यंतची लोकसंख्या गृहित धरून जल जीवन मिशनमधून निधी मंजूर केला आहे. मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळांमध्ये ‘स्मार्ट स्कूल’ची संकल्पना राबविली आहे. त्यासाठी उचगाव आणि मणेरमळा येथे ७५ लाखांचा निधी खर्च केला आहे. इंटरॅक्टिव्ह पॅनेलयुक्त डिजिटल क्लास रूम, मैदान, शाळेसाठी सोलर पॅनेल देऊन सुसज्ज स्मार्ट स्कूल विकसित केली आहेत. संभाजीनगर बसस्थानकासाठी दहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या बसस्थानकाला ‘छत्रपती संभाजी महाराज बसस्थानक’ असे नाव दिले आहे. सरस्वती चित्रमंदिरजवळ सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बहुमजली पार्किंगचे काम सुरू आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी एलईडी स्ट्रिप्स सुरू केल्या आहेत.

प्रश्‍न : भविष्यातील विकासकामांचे नियोजन कसे?
उत्तर : उपनगरात मॉडेल रस्ते करण्यासाठी पदपथ, डस्टबिन ठेऊन कोल्हापूर शहरासह कचरामुक्त मतदारसंघ करण्याचा प्रयत्न आहे. कोल्हापूर दक्षिणमध्ये प्रायोगिक तत्त्‍वावर १३ रस्ते अशा पद्धतीने डिझाईन केले आहेत. विमानतळ विस्तारीकरण व अंतर्गत रस्ते तयार करणे. तरुण मनुष्यबळाला कौशल्य विकासाची जोड देणे आवश्यक आहे.

प्रश्‍न : रोजगार निर्मितीबाबत तुमचे नियोजन काय?
उत्तर : एकीकडे बेरोजगारी वाढत असताना दुसरीकडे कंपन्यांना कुशल मनुष्यबळ मिळत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर ‘मिशन रोजगार’च्या माध्यमातून कोल्हापुरातील युवक-युवतींना सध्याच्या कंपन्यांना आवश्यक असलेले प्रशिक्षण कोल्हापूरमध्येच उपलब्ध करून त्यांना रोजगारक्षम करण्याचा प्रयत्न आहे. कौशल्य विकास काळाची गरज बनली आहे. बदलत्या जगानुसार ज्ञानामध्येही वेळोवेळी बदल करणे, नवनवी स्किल शिकणे आवश्यक आहे. या प्रशिक्षण केंद्रात उपलब्ध असलेले अभ्यासक्रम कोल्हापूरमध्ये लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. बेळगाव येथील गव्हर्न्मेंमेंट टूल रूम अँड ट्रेनिंग सेंटर (GTTS) या कौशल्य विकास आणि प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन माहिती घेतली. तेथील अभ्यासक्रम, पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, प्रशिक्षण आदींच्या माहितीचा भविष्यात निश्‍चित उपयोग होईल.

प्रश्‍न : महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळानंतर विकासकामे कशी केलीत?
उत्तर : महाविकास आघाडीचे सरकार असताना कोल्हापूर विधानसभा मतदारसंघासाठी ७० कोटी रुपयांची विकासकामे मंजूर झाली होती. सरकार बदलल्यानंतर हा निधी दुसरीकडे लागणार म्हणून रद्द केला. यावेळी न्यायालयात जाऊन यातील काही निधी परत मिळवला. कळंबा तलावाच्या सुशोभीकरणाचे ४ कोटी ५० लाख रुपये परत मिळविले. याशिवाय १० कोटी रुपयांचे इनडोअर स्टेडियम उभारणार होतो. त्याची वर्कऑर्डरही झाली होती. सकाळी उद्‌घाटन होणार होते. मात्र, सकाळी दहा वाजता हा निधी महायुती सरकारने अचानक रद्द केला, याचे पत्रही आमच्याकडे आहे. कोल्हापूरचा विकास करीत असताना महाविकास आघाडीचे सरकार असताना विरोधी आमदारांच्या कामात आडकाठी आणली नाही. याउलट महायुती सरकारने वर्कऑर्डर झाली असातनाही काम रद्द केले. हे जनता विसरणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

Summer Travel 2026: यंदा उन्हाळी पर्यटनाला महागाईच्या झळा; विमान कंपन्यांकडून भाडेवाढ शक्य, आधीच बुकिंगचा तज्ज्ञांकडून सल्ला

पोयरी हलु हलु नाच… ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर viral video

SCROLL FOR NEXT