कोल्हापूर

गुणवत्ता सिद्ध, पण संशोधन वाढविण्याचे आव्हान

CD

फोटो 25788

संशोधनाचा टक्का वाढविण्याचे आव्हान
शिवाजी विद्यापीठाचा आज ६२ वा वर्धापन दिन; दक्षिण महाराष्ट्राच्या ज्ञानकेंद्राला करावी लागणार नेटाने वाटचाल

संतोष मिठारी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः दक्षिण महाराष्ट्राचे ज्ञानकेंद्र शिवाजी विद्यापीठ उद्या, सोमवारी ६२ वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाची कॅटगरी वन श्रेणी आणि नॅकचे अव्वल मानांकन पटकावून गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या विद्यापीठाचा नवा बदल स्वीकारात कायापालाट होत आहे. वसतिगृह, अधिविभागांच्या नव्या इमारती उभारत आहेत. पेटंटचा टक्का वाढला आहे. नव्या अभ्यासक्रमातून अद्ययावत शिक्षण आणि वर्षागणिक संशोधनातील कामगिरी वाढवत वाटचाल सुरू आहे. पण, दुसरीकडे स्वायत्त महाविद्यालय आणि क्लस्टर, खासगी विद्यापीठांच्या वर्षागणिक वाढणाऱ्या संख्येमुळे आता या ज्ञानकेंद्रासमोर विद्यार्थी संख्या कायम राखणे, प्लेसमेंटचे प्रमाण आणि संशोधनाचा टक्का वाढविणे आदी आव्हाने उभी आहेत. ती पेलत सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी देण्यासाठी विद्यापीठाला नेटाने उभे राहावे लागणार आहे.
-
अशी आहेत आव्हाने
१) संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण उपलब्ध झाल्याने तेथे प्रवेशित होण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. त्याने विद्यापीठ कॅम्पसमधील अभ्यासक्रमांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच ते दहा टक्क्यांनी कमी झाले आहे. विद्यापीठात प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढवावे लागेल

२) विज्ञान विद्याशाखेतील प्लेसमेंटचे प्रमाण चांगले. वाणिज्य व व्यवस्थापन, मानव्यविद्याशाखा आदी इतर शाखांतील प्लेसमेंटचे प्रमाण १५ ते २० टक्क्यांनी वाढविणे आवश्यक.

३) एनआयआरएफ, क्यू रँकिंगमधील मानांकन सुधारण्यासाठी विज्ञानबरोबरच इतर विद्याशाखांमधील आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधनाचा टक्का वाढविण्याचे मोठे आव्हान

४) प्रशासकीय सेवकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून, त्याने प्रशासनावर आणि प्राध्यापकांच्या ५० टक्के जागा रिक्त असल्याने अध्यापन, संशोधन कार्यावर येत असलेला ताण कमी करणे

५) विद्यापीठ कॅम्पसवरील खर्च कमी ठेवण्यासह विद्यार्थ्यांना माफक शुल्कामध्ये गुणवत्तापूर्ण आणि अन्य खासगी, स्वायत्त विद्यापीठांच्या तुलनेत दर्जेदार शिक्षण आणि त्यादृष्टीने आवश्यक सुविधा उपलब्ध करणे
...........
विद्यापीठाची कार्यवाही काय?
१) कॅम्पसमधील अधिविभागांमध्ये बी.ए. स्पोर्टस्, बी.ए. फिल्म मेकिंग, बी.कॉम. (बीएफएसआय), बी.एस्सी.- एम.एस्सी. इकॉनॉमिक्स आदी नावीन्यपूर्ण, कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. ऑनलाईन शिक्षणावर भर दिला आहे. एमबीए पाठोपाठ एम. एस्सी., मॅथमेटिक्स, कॉम्प्युटर सायन्स, एम. कॉम. अभ्यासक्रम ऑनलाईन सुरू केले जाणार आहेत

२) आंतरराष्ट्रीय विद्यापीठासमवेत सामंजस्य करार केल्याने तेथे संशोधन आणि संशोधक विद्यार्थी म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना संधी मिळाल्या आहेत. प्लेसमेंट वाढीसाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर संस्थांसमवेत करारांचे प्रमाण वाढविण्यावर भर

३) विज्ञान आणि इतर विद्याशाखांनी संयुक्तपणे संशोधन करण्याची सुरुवात

४) प्रशासनात आयसीटीचा वापर वाढविला जात आहे. त्याची सुरुवात अकौंट, परीक्षा, संलग्नता, विद्यार्थी सुविधा केंद्रात केली आहे. प्राध्यापकांच्या ७२ पदांची भरती प्रक्रिया सुरू

५) पाण्याबरोबर आता विजेबाबतही स्वयंपूर्ण होण्यासाठी नवा ५५० किलोवॉटच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू. कॅम्पस सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, नेटवर्किंगच्या वापरले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर त्यांना पुढील रोजगार अथवा शिक्षण, संशोधनाची खात्री देणारे नवे अभ्यासक्रम राबविण्याचे धोरण ठरविले जात आहे.
...........
कोट
६२ वर्षांमध्ये विद्यापीठाने विविध स्थित्यंतरातून वाटचाल करत संशोधन, शिक्षणात ठसा उमटविला आहे. सोशल कनेक्ट वाढविला आहे. सर्व घटकांशी संवाद साधून त्यांना बरोबर घेऊन काम सुरू आहे. आता नवीन आव्हाने समोर आहेत. ती यशस्वीपणे पेलून ‘एनआरआयएफ’ रँकिंगमध्ये पहिल्या शंभर संस्थांच्या यादीत विद्यापीठाचा समावेश करण्याचे ध्येय ठेवून प्रशासकीय गती कायम ठेवत आम्ही निघालो आहोत. पुढील पाच वर्षांत ही गती कायम ठेवली तर निश्चितपणे यश मिळणार आहे.
-डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू
...........
उल्लेखनीय पावले
*पदवी, पदव्युत्तर पातळीवर नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमांची सुरुवात
*राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत राज्यात आघाडी
*पी. एम. उषा योजनेतून मिळविला वीस कोटींचा निधी
*लोकसहभाग, देणगीतून मुलींसाठी वसतिगृहाची उभारणी
*कुस्ती कॉम्प्लेक्सची उभारणी, खेळाडूंना प्रोत्साहन निधी
.............
चार्ट करा
दृष्टिक्षेपात विद्यापीठ
क्लस्टर विद्यापीठांची संख्या - २
स्वायत्त महाविद्यालये-१८
अध्यासने व अभ्यासकेंद्रे-२९
अधिविभाग-३४
संलग्नित महाविद्यालये-२७६
--
दूरस्थ, ऑनलाईन शिक्षण केंद्राचे विद्यार्थी संख्या- सुमारे २५ हजार
विद्यार्थी संख्या- सुमारे २ लाख २५ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EV कडे वाढता कल, पण सुरक्षिततेचा मोठा प्रश्न! दुर्घटनेनंतर मंत्र्यांचा इशारा; चार्जिंगला लावून झोपलेल्या कुटुंबातील 8 जण जिवंत जळाले

Latest Marathi News Live Update : लाकडाच्या मागणीत 50 टक्के वाढ

Tiger Hunting Video : मृत्यू समोर असताना मोर उडून गेला, पण वाघाच्या तावडीत 'त्या' हरणाच्या पिल्लाचा दुर्दैवी अंत झाला; जबड्यात धरलेली मान पाहून मन हेलावून जाईल!

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! आठवड्यात 6 हजारांची घसरण; आजचा 1 तोळ्याचा भाव किती?

Hockey World Cup चे बिगूल वाजले! भारत-पाकिस्तान संघात पुन्हा आमने-सामने; १६ संघांचे ग्रुप्स जाहीर

SCROLL FOR NEXT