कोल्हापूर

निवासी फुटबॉल केंद्रासाठी एकत्र या...

CD

निवासी फुटबॉल केंद्रासाठी एकत्र या...
..........................................
25854
ओंकार जाधव

फुटबॉल केंद्रामुळे नवोदितांना संधी मिळेल
पायाभूत सुविधांसाठी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन विविध योजना राबवत आहे. कारण देशाच्या कानाकोपऱ्यात फुटबॉल खेळ वाढावा, केवळ वाढावाच नव्हे तर दर्जेदार खेळाडू, पंच, व्यवस्थापन, प्रशिक्षक निर्माण व्हावेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, राज्याचा क्रीडा विभाग खेळासंबधी काम करीत आहे. या विभागाच्या लेखी फुटबॉल हा खेळ शालेय पातळीवरच अधिक खेळला जातो. त्यामुळे ही मंडळी धो-धो पावसात शालेय स्पर्धा घेतात. अशा स्थितीत देशाचे उज्ज्वल भविष्य कसे निर्माण होणार आहे. याबाबत क्रीडा विभाग गंभीर नाही. त्यांच्याकडे असलेले क्रीडा प्रबोधिनीअंतर्गत निवासी फुटबॉल केंद्र अद्यापही कोल्हापुरात सुरू केले जात नाही. तसे पाहता क्रीडा विभागाच्या दृष्टीने निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र सुरू करणे ही किरकोळ बाब आहे. ती त्यांच्या अखत्यारित असूनही का सुरू करत नाहीत? हा प्रश्‍न आम्हा खेळाडूंना पडला आहे. आता विधानसभा निवडणुका संपल्यानंतर या केंद्रासाठी एक पाऊल आम्हीही उचलू. त्यानंतर हंगामात नवोदितांसाठी हे केंद्र म्हणजे गिफ्ट ठरले, अशी तरतूद आम्ही खेळाडूच करू. निवडणुकीत जिल्ह्यातील जे उमेदवार निवडून येतील, त्यांनी कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या अस्मितेचा हा प्रश्‍न सोडविणे गरजेचे आहे.
- ओंकार जाधव, राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू
..............
25855
सतीश खोत

...तर नवोदितांना संघांची दारे खुली होतील
फुटबॉल हंगाम काही दिवसांतच सुरू होईल. त्यानंतर शहराचे वातावरण फुटबॉलमय होईल. यंदाच्या लीग स्पर्धेत सोळा संघांतून काही नवोदित चेहरेही दिसतील; पण ते प्रत्यक्षात खेळणारे असावेत. प्रत्येक खेळाडू प्रशिक्षित असावा; जेणेकरून खेळताना इजा होणार नाही. दर्जेदार, कौशल्यपूर्ण खेळ फुटबॉल रसिकांना मिळावा. खेळाचा विकास कसा होईल याकडे लक्ष देणारी मंडळी हवीत. विशेषतः स्थानिक संघांपेक्षा त्यातून करियर घडेल, असे प्रशिक्षण कोल्हापुरात मिळणे गरजेचे आहे. मात्र, तशी सोय नाही. योग्य प्रशिक्षण, खेळातील तंत्रे आणि करियर घडवायचे वय उलटल्यानंतर आज स्टार खेळाडू म्हणून खेळणारे खेळाडू केवळ स्थानिकच स्पर्धांमध्येच खेळताना दिसतात. हीच मंडळी अनेक वर्षे स्थानिक संघात जागा अडवून बसतात. खेळाडूकडून चांगला खेळ झाला पाहिजे. फुटबॉल स्पर्धा म्हणजे हाणामारी नव्हे, तर मैदानातील चुरस, कौशल्यपूर्ण खेळ रसिकांना पाहायला मिळावा. त्यातून खेळाडूंचे करियर घडावे. यासाठी सर्व फुटबॉलप्रेमी, जाणकरांनी प्रयत्न करायला हवेत. याच हेतूने कोल्हापुरात खास बाब म्हणून क्रीडा विभागाने अत्याधुनिक सुविधानीयुक्त अशी फुटबॉल प्रशिक्षण देणारी संस्था किंवा निवासी फुटबॉल केंद्र सुरू करावे.
- सतीश खोत, ज्येष्ठ फुटबॉल खेळाडू
.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT