कोल्हापूर

सुरू झाली हो लगीनघाई...

CD

सुरू झाली हो लगीनघाई...
यंदा लग्नसराईत ७० मुहूर्त : आर्थिक उलाढालही वाढली

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ : तुळशी विवाहानंतर लग्नसराईला मोठ्या धामधुमीत आजपासून सुरुवात झाली. लग्नसराईतील पहिलाच विवाहाचा मुहूर्त अनेक विवाह इच्छुकांनी साधला. यानिमित्ताने शहर व ग्रामीण भागातील सर्वच्या सर्व मंगल कार्यालये फुल्ल झाली होती. सकाळपासूनच सनईचे मंगल सूर मंगल कार्यालयात उमटू लागले आणि यंदाच्या लग्नसराईची सुरुवात दणक्यात झाली असल्याची प्रचिती सर्वांनाच मिळाली. दरम्यान, यंदाच्या लग्नसराईत एकूण ७० मुहूर्त असून, विवाह इच्छुकांचे विवाहाचे बार उडणार आहेत.
विवाहासाठी इच्छुक असलेल्यांच्या डोक्यावर यंदा नोव्हेंबरपासूनच अक्षता पडण्यास प्रारंभ झाला आहे. लग्न जुळलेल्यांच्या कुटुंबीयांनी आतापासून मंगल कार्यालये आरक्षित करण्यास सुरुवात केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा लग्नसराईचा कालावधी आठ महिन्यांचा आहे, त्या अनुषंगाने विवाह इच्छुकांची व त्यांच्या कुटुंबीयांची तयारी जोमात सुरू आहे.
विवाह सोहळा हा दोन कुटुंबांतील महत्त्वाचा आनंद सोहळा असतो. यासाठी प्रशस्त मंगल कार्यालयांना मागणी असते. पार्किंग व्यवस्था असलेल्या ठिकाणांना अधिक पसंती दिली जाते. धावपळ टाळण्यासाठी बुकिंगला सुरुवात झाली आहे, तर विवाह इच्छुक तरुण, तरुणींचे लग्नासाठी पाहणी कार्यक्रमास वेग आला आहे. नोव्हेंबर ते जून या आठ महिन्यांत विवाहासाठी ७० मुहूर्त आहेत. त्यामुळे या मुहूर्तावर शुभमंगल सावधानसह मंगलाष्टका ऐकायला मिळणार आहेत.
-------
विवाहाचे मुहूर्त असे
नोव्हेंबर : १७, २२, २३, २५, २६, २७
डिसेंबर : ३, ४, ५, ६, ७, ११, १२, १४, १५, २०, २३, २४, २६
जानेवारी : १६, १७, १९, २१, २२, २६
फेब्रुवारी : ३, ४, ७, १३, १६, १७, २०, २१, २२, २३, २५
मार्च : १, २, ३, ६, ७, १२, १५, २४, २६
एप्रिल : १४, १८, १९, २०, २१, २२, २५, ३०
मे : १, ५, ६, ७, ८, १०, १३, १४, १६, २०, २३, २४
जून : २, ४, ५, ६, ८

चौकट
डिसेंबरमध्ये सर्वाधिक तर जूनमध्ये कमी मुहूर्त
डिसेंबरमध्ये यंदा सर्वाधिक मुहूर्त असल्याने सर्वाधिक विवाह सोहळे सजणार आहेत. या महिन्यात एकूण १३ मुहूर्त आहेत. त्यापाठोपाठ मे महिन्यात १२ विवाह मुहूर्त आहेत. डिसेंबर आणि मेमध्ये सुट्यांचा हंगाम असल्याने आतापासूनच या महिन्यातील बुकिंग करण्यास सुरुवात झाली आहे. जूनमध्ये सर्वांत कमी म्हणजेच पाच मुहूर्त आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणसोबतचा संघर्ष भारत अन् चीनला रोखण्यासाठी, इराणच्या अधिकाऱ्याने सगळंच सांगितलं, अमेरिकेला सुनावलं

Safe Investment : अमेरिका–इराण युद्धाने शेअर बाजार हादरला! घाबरू नका… या 6 गुंतवणुकीत तुमचे पैसे राहतील सुरक्षित

Latest Marathi News Live Update : पुण्यासह राज्यात उन्हाचा तडाखा, सलग दोन दिवस कमाल तापमानाने पस्तीशी ओलांडली

Budget 2026: यंदा राज्य सरकारची कसरत! तूट, कर्जामुळे योजना व विकासाचा समतोल साधण्याचे आव्हान

Nashik Municipal Corporation : नाशिक मनपाचा शेअर बाजारात डंका! २०० कोटींच्या 'ग्रीन बॉण्ड'ला ५४० कोटींचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT