कोल्हापूर

कलापूरचा सिनेमॅन

CD

लोगो- सांस्कृतिक कोल्हापूर
...................
फोटो- २६२४०

राज्य नाट्य स्पर्धेसाठी संघांची जोरदार तयारी
सोमवारपासून प्रारंभ, ‘सीपीआर’, वैद्यकीय महाविद्यालय संघांचाही सहभाग

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे येथील केंद्रावरील राज्य नाट्य स्पर्धेला सोमवारपासून (ता. २५) प्रारंभ होणार आहे. एकूण वीस संघांनी सहभाग नोंदवला असून, यंदा दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात रोज सायंकाळी सातला नाटकाचे प्रयोग होतील. दरम्यान, संघांच्या सराव तालमींना वेग आला आहे.
पंधरा डिसेंबरपर्यंत स्पर्धा होणार असून, सुगुण नाट्य संस्थेच्या ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाने स्पर्धेचा पडदा उघडणार आहे. यंदाच्या स्पर्धेत एकूण वीस संघ असले तरी दोन संघ नव्याने स्पर्धेत उतरले आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचा संघ ‘टेक इट लाईकली’ हे नाटक सादर करणार असून, त्यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सहभाग असेल. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचा संघ ‘पद्मश्री धुंडिराज’ हे नाटक सादर करणार असून, या संघांत रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. दरम्यान, यंदा राजर्षी शाहू स्मारक भवनात स्पर्धा होणार असल्याने आसन क्षमता कमी आहे. त्यामुळे विनामूल्य पासेस दिले जाणार नाहीत. सिझन तिकिटेही कमी केली जाणार असून, रोजच्या प्रयोगाच्या रोज प्रवेशिका घ्याव्या लागणार आहेत. दहा व पंधरा रुपये असे प्रवेशिका शुल्क राहणार आहे.
...........

२६२२६
कलापूरचा ‘सिनेमॅन’ कोलकत्ता फेस्टिव्हलमध्ये
बालचित्रपट चळवळ रुजवणाऱ्या अवलियाची कथा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः येथील तरुणाईने साकारलेल्या ‘सिनेमॅन’ या सिनेमाची कोलकत्ता फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे. स्पर्धा विभागातून या सिनेमाचा यानिमित्ताने इंडियन प्रीमियर होणार आहे. उमेश बगाडे लिखित व दिग्दर्शित या सिनेमात किशोर कदम, पृथ्वीराज चव्हाण, सिद्धार्थ बदी, रिचर्ड क्लेन, रिकी वूड यांच्या भूमिका आहेत. सुमित पाटील, उमेश बगाडे, सरिता पाष्टे, कौशल पाटील, अनिश नायर यांची निर्मिती आहे.
आनंद नावाचा एक सेवानिवृत्त शिक्षक आहे. गेल्या दशकापासून चिल्ड्रन्स फिल्म क्लबच्या माध्यमातून दुर्गम खेड्यांतील मुलांपर्यंत चित्रपट साक्षरता आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांच्या विरोधाला न जुमानता त्यांचा हा सारा प्रवास सुरू आहे. या प्रवासातील विविध रंजक घटना, मुलांतील सर्जनशीलता, सिनेमाचा समाजावरील परिणाम अशा विविध अंगांनी हा सिनेमा उलगडतो.
बगाडे यांच्या ‘अनाहुत’ या लघुपटाला २०१८ मध्ये सर्वोत्कृष्ट प्रेक्षक फिल्म पुरस्कार मिळाला असून, ‘चौकट’ लघुपटाची निवड २०१६ च्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘भारतीय पॅनोरमा’साठी झाली होती. ‘सिनेमॅन’ हा त्यांचा पहिलाच पूर्ण लांबीचा सिनेमा आहे. कोलकत्ता फेस्टिव्हलमध्ये सिनेमाची निवड ही आमच्या टीमसाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचे ते सांगतात.
............
२६२२७
चिल्लर पार्टीतर्फे
विद्यार्थ्यांसाठी रविवारी सिनेमा
कोल्हापूर, ता. १९ ः येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे रविवारी (ता. २४) ‘अगेन्स्ट द वाईल्ड सरव्हाइव्ह द सेरेंगटी’ हा सिनेमा दाखवला जाणार आहे. राजर्षी शाहू स्मारक भवनात सकाळी दहा वाजता चित्रपट दाखवला जाणार असून, शालेय विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश असेल.
दक्षिण आफ्रिकेच्या जंगलातून एका मालवाहू विमानाने छोटे बहीण-भाऊ व त्यांचा कुत्रा घरी परतत असताना मध्येच त्या विमानाला अपघात होतो. विमान नष्ट होते. विमान चालकाचा अपघातात मृत्यू होतो आणि त्यानंतर त्या तिघांचाच प्रवास सुरू होतो, अशा मध्यवर्ती संकल्पनेवर हा सिनेमा बेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून बेदम मारहाण; जिल्हा परिषद शाळेतील संतप्त प्रकार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Junnar Crime : लग्नास नकार; जुन्नरमध्ये विद्यार्थिनीवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, विद्यार्थिनी गंभीर जखमी

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

SCROLL FOR NEXT