फोटो 26300
मतदान प्रक्रियेसाठी कडकोट पोलिस बंदोबस्त
२०० अधिकारी : तीन हजार पोलिस, ३८०० होमगार्डचा पहारा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता. २०) मतदान होत आहे. मतदान केंद्रे, संवेदनशील भाग अशा ठिकाणी मंगळवारपासूनच बंदोबस्त तैनात करण्यात आला. जिल्ह्यात पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली २०० अधिकारी व तीन हजार पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त नेमला आहे, तर केंद्रीय व राज्य राखीव दलाच्या ११ तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या असून, सुमारे ३८०७ होमगार्डही मदतीला असणार आहेत.
जिह्यातील सर्व मतदान केंद्रांसाठी ईव्हीएम मशीन रवाना झाल्यानंतर पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला. मागील निवडणुकांमध्ये वादाच्या प्रसंगाची नोंद आहे, अशा ठिकाणी अतिरिक्त पोलिस नेमले आहेत. मंगळवारी सकाळी सर्व बंदोबस्त रवाना झाला.
मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीने मोबाईल, कॉडलेस फोन, वायरलेस सेट वापरण्यास पोलिसांकडून मनाई केली आहे. पाचहून अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन बेकायदेशीर जमाव करण्यासही बंदी असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले.
चार्ट करा
बंदोबस्त असा
अपर पोलिस अधीक्षक : २
पोलिस उपअधीक्षक : ९
पोलिस निरीक्षक : २४
पोलिस उपनिरीक्षक : १४८
पोलिस अंमलदार : ३१०४
होमगार्ड : ३८०७
केंद्रीय व राज्य राखीव तुकड्या : ११
कोट
लोकशाहीतील अत्यंत महत्त्वाचा भाग असणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडावे यासाठी पोलिस प्रशासन कार्यरत आहे. आचारसंहितचा भंग होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी. पोलिस कर्मचाऱ्यांनीही मतदान केंद्रांवर गर्दीचे योग्य नियंत्रण करावे, यासाठी सूचना दिल्या आहेत. मतदारांनी दबावाला, प्रलोभनांना बळी न पडता मतदानाचा हक्क बजावावा. : महेंद्र पंडित, पोलिस अधीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.