दर्शन तीन तासांत होण्यासाठी
कृत्रिम बुद्धिमत्ता, नवतंत्राचा वापर
तिरुमला तिरुपती देवस्थान समितीचा निर्णय
तिरुपती, ता. १९ ः येथील व्यंकेटश्र्वरांचे दर्शनाची वेळ २० ते ३० तासांवरून २ ते ३ तास आणण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवतंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय तिरुमला तिरुपती देवस्थान समितीच्या बैठकीत घेण्यात आला. देवस्थानचे अध्यक्ष बी. आर. नायडू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी विशेष कार्यकारी अधिकारी जे. श्यामला राव उपस्थित होते.
बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. यामध्ये लोकांना जलद व सुलभ दर्शन देण्यासाठी नव तंत्रज्ञान वापरण्याच निर्णय झाला, तसेच तिरुमला येथे काम करणाऱ्या हिंदू व्यतिरिक्त अन्य कर्यमाऱ्यांना अन्यत्र हलवणे आणि त्यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला पत्र लिहिण्याचे ठरविण्यात आले. तिरुमला येथील डम्पिंग यार्डमधील कचरा तीन चार महिन्यांत साफ केला जाईल. श्रीनिवास सेतू उड्डाणपुलाचे नाव गरुड वराधी असे करण्याचा निर्णयही घेण्यात आला. अलिपिरी येथे देवलोक प्रकल्पाजवळील पर्यटनासाठी दिलेली २० एकर जमीन देवस्थानला देण्याची विनंती मंडळ राज्य सरकारला करणार आहे. तसेच देवस्थानच्या ठेवींची सुरक्षितता लक्षात घेऊन खासगी बँकांमधील ठेवी काढून त्या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये जमा करण्याचा निर्णय पुढील संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्याचे ठरले. तसे लाडू बनवताना तुपाचा दर्जा उच्च ठेवण्याची सूचना करण्यात आली. बैठकीस देवस्थानचे सदस्य भानुप्रकाश रेड्डी यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
चौकट
ठळक निर्णय
- दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी तिरुपतीतील स्थानिकांना दर्शन
- तिरुमलामध्ये कोणतेही राजकीय विधान केल्सास कायदेशीर कारवाई होणार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.