26375
कोल्हापूर : शहरातील के. एम. सी. महाविद्यालयातील केंद्रावर खेळाडू मतदानाचे आवाहन करत आहेत, अशी संकल्पना घेऊन फलक लावण्यात आले आहेत.
चला, राष्ट्रीय कर्तव्य बजावूया, मतदान करूया
विधानसभेसाठी आज मतदान; प्रशासन सज्ज, केंद्रावर अधिकारी रवाना
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ : विधानसभेसाठी उद्या (ता. २०) जिल्ह्यातील सर्व तीन हजार ४५२ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठी मतदान केंद्र प्रमुख आणि तेथील कर्मचारी आज नियुक्त केंद्रांवर रवाना झाले. मतदारसंघनिहाय कर्मचाऱ्यांचे तिसरे प्रशिक्षण झाले. तेथेच त्यांना नियुक्त केंद्राची माहिती देण्यात आली. तेथून सकाळी दहाला केंद्रप्रमुख आणि कर्मचारी आपापल्या केंद्रांवर रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत मतदान यंत्र आणि इतर आवश्यक साहित्य देण्यात आले.
उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सकाळी नऊला स्ट्राँग रूम उघडण्यात आली. त्यातील मतदान यंत्रे बाहेर काढण्यात आली. त्यानंतर मतदानयंत्रांची सरमिसळ करून त्यांचे मतदानकेंद्राप्रमाणे वाटप करण्यात आले. यानंतर कर्मचाऱ्यांचे तिसरे प्रशिक्षण झाले. यामध्ये मतदानाला प्रत्यक्ष सुरू करताना कोणती प्रक्रिया राबवायची, कोणता अर्ज कधी भरायचा, याचे प्रशिक्षण दिले गेले. सुरक्षेसाठी कशी सतर्कता ठेवायची, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी कोणते काम करायचे, मतदानाच्या रांगेचे नियंत्रण कसे करायचे, मतदानयंत्र कसे हाताळायचे, याचे प्रशिक्षण देण्यात आले. अधिकाऱ्यांची मतदान केंद्रावर नियुक्तीही करण्यात आली.
करवीर मतदारसंघातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृहात झाले. कोल्हापूर उत्तरमधील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण विवेकानंद महाविद्यालय, दक्षिण मतदारसंघातील प्रशिक्षण व्ही. टी. पाटील सभागृहात झाले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे उत्तर मतदारसंघातील प्रशिक्षणाला उपस्थित होते.
कर्मचारी मुक्कामी रवाना
प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तत्काळ मतदानकेंद्र प्रमुख आणि कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर रवाना झाले. यासाठी वाहनाची व्यवस्थाही करण्यात आली होती. संध्याकाळी पाचपर्यंत केंद्रप्रमुख आणि कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचले.
पहाटे साडेपाचपासून प्रक्रिया प्रारंभ
मतदानाची वेळ सकाळी सातला असली तरी याची प्रक्रिया पहाटे साडेपाचपासून सुरू होणार आहे. पहिल्यांदा प्रत्येक केंद्रावर उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर मतदान यंत्राची चाचणी घेतली जाईल. यामध्ये प्रत्येक प्रतिनिधीला मतदान चाचणी घ्यावी लागेल. प्रत्येक मतदारयंत्रावर ५० मतांची चाचणी होईल. त्यानंतर मतदानाला सुरुवात होईल. सायंकाळी पाचपर्यंत मतदानासाठी वेळ निश्चित आहे.
मतदान केंद्रांवर विविध संकल्पनांना
जिल्ह्यातील १४१ मतदान केंद्रांवर विविध संकल्पना राबवण्यात आल्या आहेत. महिला सुरक्षा, क्रीडा, पर्यावरण संवर्धन, आदींचा त्यात समावेश आहे. याव्दारे लोकांना मतदानासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.