कोल्हापूर

डांगडुंग

CD

डांगडुंग
कार्टून
--
मतदान करायला लागतंय...
----
भावानों, बहिणींनो, ताई-माई, आक्कानों!
माळावरल्या शाळंत आज जायला लागतंय
काका, आण्णा, दादांनों!
मताच्या रांगत जरा उभा राहायला लागतंय
नंबरानं जाऊन मशीनवर बॉट दाबाय लागतंय
आणि जाग्यावर पलटी कराय लागतंय
शामादा!, औत जरा येळानं जुपाय लागतंय
कापडं नवी घालून मतदानाला जायाला लागतंय
रामादा! वैरणपाणी लवकर आवराय लागतं.
आणि मतदान केंद्र गाठायं लागतंय
सासूबाई, सूनबाई.! घरातलं जरा आटपाय लागतंय
लवकर, लवकर मताला जायायं लागतंय
ये, चिंके, ये पिंके!, अगं आवर पटापटा..
मत द्यायला जायचं, पावलं उचला चटाचटा..
आफिसातलं साहेब, साहेबांचे साहेब
जरा येळ काढाय लागतोय
बोटावर शाईचं टिपकं लावाय लागतंय
कोण आला, कोण गेला
मत द्यायचं; मात्र योग्य उमेदवारालाच द्यायला लागतंय
मताचं दान कराय लागतंय
लोकशाहीचं पवित्र कर्तव्य
बजावायला लागतंय
-
मंडळी...
- विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ‘डांगडुंग’ सदरातून महिनाभर आमच्या तमाम वाचकजनांसाठी आम्ही घेऊन आलो होतो, निवडणुकीच्या गंमती, नेत्यांच्या जंमती, करामती. आमचं वाचलं, आम्हाला पदरात घेतलं, समजून घेतलं. याच निवडणुकीच्या निमित्तानं लोकशाहीनं १८ वर्षांवरील प्रत्येकाला मतदानाचा पवित्र हक्क दिला आहे. तो पवित्र हक्क बजावत, आपल्या बळकट लोकशाहीला आणखी बळकट करावं. प्रत्येकाने मतदान करावं, हीच विनंती.
पुन्हा भेटू पुढच्या निवडणुकीच्या सुगीला..
(समाप्त)
--
तोपर्यंत... रामराम!, अलविदा!, खुदा हाफिज!, Bye!, Bye!,
--------
तुमचाच जीवाभावाचा मैतर
-सबना मास्तर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी MS Dhoni ला कॉल; सूर्याने सांगितला, 'कॅप्टन कूल'चा सल्ला कसा कामी आला

Mumbai Hotels Closed: मुंबईतील सर्व हॉटेल्स बंद होणार? गॅस तुटवड्यामुळे मोठा फटका, २० टक्के हॉटेल्सना टाळे

शार्दूलची तिसरी पत्नी झाल्यामुळे तुझ्यावर टीका झाली... नेहा पेंडसे थेट उत्तर देत म्हणाली- काही लोकांना वाटतं की...

Latest Marathi News Live Update : लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी, एकाला अटक

समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली आहे; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण, मोठी भूमिका मांडण्याचं नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT