कोल्हापूर

‘पोस्टमार्टम’ सेवा देणारी दुसरी पिढी....

CD

लोगो ः ह्युमन स्टोरी
फोटो 26384, 26386

‘बापलेका’ची सेवा भारी, शवविच्छेदनाची जबाबदारी
सीपीआर शवागारात रणजित व शुभम गोहिरे यांचे काम

गौरव डोंगरे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः ‘पोस्टमार्टम’ हा शब्दही सर्वसामान्यांच्या अंगावर काटा आणणारा. आपल्या एखाद्या नातेवाइकांबाबत अशी वेळ आली, तरी सुरुवातीपासून नकारघंटा सुरू होते. ‘मृतदेह’ आहे तसा आम्हाला द्या, असे सांगणारे मृताचे कुटुंबीय अनेकदा वाद घालतात; परंतु मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करणारा शवविच्छेदन अहवाल सर्वात महत्त्वपूर्ण मानला जातो. हे शवविच्छेदनाचे काम रणजित व शुभम गोहिरे हे ‘बापलेक’ बजावत आहेत.

गळफास, अपघाती मृत्यू, विष पिल्याने मृत्यू, बुडून मृत्यू यासह आकस्मिक मृत्यूचे कारण शोधण्यासह मृत्यू नेमका केव्हा झाला असावा, याचाही नेमका अहवाल शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होतो. संशयास्पद मृत्यूमध्ये वाढलेली गुंतागुंत पोलिसांसमोर आव्हान निर्माण करते. अशावेळी सर्व शंकांचे निराकरण करण्यासाठी मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीचा अहवाल महत्त्वपूर्ण पुरावा ठरतो. न्यायालयाकडेही हा पुरावा सादर करण्यात येतो.
रणजित गोहिरे मागील २५ वर्षांपासून सीपीआर शवागारामध्ये सेवा देत होते. सेवानिवृत्तीनंतर काही काळ त्यांनी व्हाईट आर्मी संस्थेच्या माध्यमातून बेवारस मृतदेहांवर अंत्यविधी करण्याच्या कार्यात पुढाकार घेतला; परंतु शवविच्छेदन विभागाकडे येणाऱ्या कर्मचाऱ्यांचीच संख्या कमी असल्याने रणजित यांना आता पुन्हा कंत्राटी तत्त्वावर सेवेत घेण्यात आले.
लग्नानंतर रणजित गोहिरे कराड येथे पत्नीला आणण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांचे सासरेही तेथील रुग्णालयात शवविच्छेदनाचेच काम करत होते. त्यांच्याकडून रणजित यांनी सहज माहिती घेतील. पुढे रणजितही आरोग्य विभागात नोकरीला लागले. तेव्हा त्यांनीही शवविच्छेदनाचेच काम करण्याची इच्छा व्यक्त केली. प्रशासनाने त्यांना प्रशिक्षण देऊन ही सेवा बजावण्याची जबाबदारी दिली. रणजित हे त्यांच्या सासऱ्यांना या कामातील पहिले गुरू मानतात. रणजित यांनी आतापर्यंत सुमारे ५० हजारांवर मृतदेहांची उत्तरीय तपासणी केल्याचे सांगितले.

चौकट
मुलगाही निष्णात
रणजित यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांचा मुलगा शुभम आरोग्य सेवेत आला. त्यानेही वडिलांप्रमाणे हेच काम करण्याची तयारी दर्शवली. त्यानेही प्रशिक्षण घेऊन शवविच्छेदनाच्या जबाबदारीचे पूर्ण काम स्वीकारले. तो २०१८ पासून सीपीआरच्या शवविच्छेदन कक्षाकडे कार्यरत आहे. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी पुलावरून बस कोसळून झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला होता. तर याचवेळी वेगवेगळ्या अपघातातील अन्य मृतदेहही सीपीआरमध्ये आले होते. रणजित व मुलगा शुभम या पिता-पुत्राने एकाच दिवसात तब्बल २२ मृतदेहांचे शवविच्छेदन पूर्ण केले होते.

कोट
मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी आमच्या विभागाचे वैद्यकीय अधिकारी काही नमुने घेण्यास सांगतात. यानुसार रक्ताचे, मृतदेहाच्या वेगवेगळ्या भागांचे नमुने केमिकल ॲनालिसीससाठी पाठविले जातात. हे अत्यंत जबाबदारीचे काम असले तरी दुसऱ्या बाजूला शवागाराबाहेर थांबलेले नातेवाईक शोकाकूल, तर काही वेळा संतापलेले असतात. त्यांच्या भावना सांभाळून घेऊन आमची कामगिरी पार पाडावी लागते.
- रणजित गोहिरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT