विद्यापीठ विभागीय जलतरण
स्पर्धेत शाहू कॉलेजचे यश
कोल्हापूर, ता. २४ ः सागर पाटील जलतरण तलावावर झालेल्या शिवाजी विद्यापीठ विभागीय जलतरण स्पर्धेत शाहू कॉलेजच्या जलतरणपटूंनी यश मिळवले.
स्पर्धेत कॉलेजच्या तेजस मानेने १००, २०० मीटर बटरफ्लायमध्ये प्रथम, तर २०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये दुसरा, तर ५० मीटर बटरफ्लायमध्ये दुसरा क्रमांक मिळवला. ओमकार पाटील १५०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये पहिला, ८०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये दुसरा क्रमांक मिळवला. ऋषिकेश पाटीलने ४०० मीटर आय.एम.मध्ये दुसरा, १०० मीटर बॅक स्ट्रोकमध्ये दुसरा, १०० मीटर बेस स्ट्रोकमध्ये तिसरा, ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये तिसरा क्रमांक मिळवला.
मुलींमध्ये आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सुबिया मुलाणी हिने वैयक्तिक अजिंक्यपद मिळवत ४६ गुण मिळवले. यात सुबियाने ४०० मीटर फ्रीस्टाईल, ५० मीटर फ्रीस्टाईलमध्ये पहिला, तर १०० मीटरमध्ये दुसरा, २०० मीटरमध्ये दुसरा, ८०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये पहिला, १५०० मीटरमध्ये पहिला, १०० मीटर बॅक स्ट्रोकमध्ये पहिला, २०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये पहिला, ४०० मीटर आय.एम.मध्ये पहिला क्रमांक मिळवला. या तिन्ही जलतरणपटूंची २९ ते ३० नोव्हेंबर दरम्यान शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
जलतरणपटूंना मानसिंग पाटील, अंकुश पाटील, अमर पाटील, संतोष डोकरे, मोनिका कोरवी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांना संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या सरोज पाटील, महाविद्यालय विकास समितीच्या संगीता पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. डी. आर. भोसले, डॉ. गणेश लंवगारे, डॉ. विक्रमसिंह नांगरे, प्रा. सविता माजगावकर यांचे प्रोत्साहन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.