कोल्हापूर

नवीन रस्ता खोदला

CD

फोटो 28264

नवीन रस्त्याची मध्यरात्री खोदाई
सारा प्रकार शंकास्पद; तरुणाने केले चित्रीकरण

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ ः नवीन रस्ते चांगले होण्याचे नाव नसताना नवीन केलेला रस्ता पाठोपाठ खोदण्याचा प्रकार अजूनही सुरू आहे. बेलबागेतील रस्ता बऱ्याच वर्षांनंतर झालेला असताना अवघ्या दोनच दिवसांत ड्रेनेजच्या कामासाठी मध्यरात्री खोदण्यात आला. त्यानंतर अर्धे काम केले असून, सकाळपर्यंत बुजवलाही. खोदाईचा प्रकार एका तरुणाने मोबाईलवर केलेल्या चित्रीकरणाने उघड झाला. मध्यरात्री केल्या जाणाऱ्या या कामाबाबत शंका निर्माण केल्या जात आहेत. त्यामुळे महापालिकेच्या या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
बेलबागेतील पद्मावती मंदिरापासून जुने आधार हॉस्पिटलपर्यंतचा रस्ता नुकताच करण्यात येत आहे. त्यातील वर्दळ असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण सुरू होऊन नवीन रस्ता झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात होते; पण हे समाधान दोनच दिवस राहिले. काल रात्री एकच्या सुमारास ड्रेनेजच्या कामासाठी पद्मावती मंदिराजवळील चौकात दोन जेसीबीच्या सहाय्याने खोदाई केली. त्याने चौकातील नवीन रस्ता खराब झाला. ती चर बुजवण्यात आली. सकाळी उठून नवीन रस्त्याऐवजी खोदलेला रस्ता दिसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जाऊ लागला. मुळात रस्ता लवकर होत नाही. तो झाल्यानंतर लगेचच हे काम का काढले? यापूर्वी ते काम का करता आले नाही? असे प्रश्‍न उपस्थित होत होते. नागरिकांच्या संतापाला सामोरे जायला लागू नये म्हणून रात्रीत हा प्रकार केल्याची चर्चा आहे.

चौकट
प्रशासकांकडून कारवाईची अपेक्षा
यापूर्वीही अनेक ठिकाणी नवीन रस्ता झाल्यानंतर काम करण्याची हुक्की इतर विभागांना येत होती. त्यातून रस्ता खराब होऊ नये म्हणून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाणार असे सांगितले होते; पण दिवस गेला की, महापालिकेचे आदेशही संपतात हेच या प्रकारातून दिसून आले. संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. त्याच्याकडून रस्त्याचे झालेले नुकसान वसूल केले तर असे प्रकार पुन्हा होणार नाहीत, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran Policy : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का ! अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्ध युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव मंजूर

दिग्गज क्रिकेटपटूचे वाढदिवशीच निधन... होणाऱ्या पत्नीच्या निधनाची बातमी कळूनही संघासाठी उतरले होते मैदानात

Latest Marathi News Live Update : मुंबईसह उत्तर कोकणातील काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

Climate Change Health Impact: हवामान बदलाचा आरोग्याला फटका! ताप, सर्दी-खोकला आणि श्वसनविकारांच्या रुग्णांत मोठी वाढ

4 वर्षांचा प्रवास थांबणार, स्टार प्रवाहवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, मुख्य नायिकेची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT