कोल्हापूर

जैन सभा विस्तार - सांगली

CD

सांगली, कोल्हापूर, बेळगावसह सर्व आवृत्तीला घेणे.
-------------------
फोटो ः 28273


दक्षिण भारत जैन सभेचा विस्तार करणार

भालचंद्र पाटील ः आजीव सभासद नोंदणी प्रक्रियेला सुरवात

सकाळ वृत्तसेवा
सांगली, ता. २९ ः ‘‘दिगंबर जैन समाजाची शिखर संस्था असलेल्या दक्षिण भारत जैन सभेने महाराष्‍ट्र, कर्नाटकात विस्तार करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी आजीव सभासद नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. शिक्षण आणि आरोग्य या दोन प्रमुख गोष्टी केंद्रस्थानी ठेवून सभेची भविष्यातील वाटचाल समाजाला विकासाच्या दिशेने नेण्याची असेल,’’ असा विश्वास अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी व्यक्त केला.
दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील-बोरगावकर यांच्या निधनानंतर भालचंद्र पाटील यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे आली. त्यांनी पारंपरिक पद्धतीने सभेचे काम पुढे न नेता समाजाची गरज, समाजापुढील प्रश्न आणि तरुणांच्या हाताला काम, आरोग्य संवर्धन या गोष्टींना केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचा निश्चय केला. होतकरू तरुणांना उच्च शिक्षणासाठी संपूर्ण सहकार्याचे धोरण आता सभेने राबवण्याचे ठरवले आहे.
श्री. पाटील म्हणाले, ‘‘जैन समाजाचे श्रद्धास्थान श्रीक्षेत्र स्तवनिधी येथे दक्षिण भारत जैन सभेची १२५ वर्षांपूर्वी स्थापना झाली. सभेमुळे जैन समाज शिकला, प्रबोधित झाला, प्रगतिपथावर आरूढ झाला. संघटनेत आतापर्यंत हजारो कार्यकर्ते सहभागी झाले. दिगंबर जैन समाजातील असंख्य युवक, युवती, ज्येष्ठ नागरिकांनी सभा मजबूत केली. या पुढील काळात जैन समाजासमोरील आव्हाने वेगळी आहेत. शेती हे बलस्थान असले तरी त्यावर अवलंबून राहण्याची परिस्थिती नाही. उद्योग, व्यापार, शिक्षणातून विकासाला पर्याय नाही. हे आव्हान पेलण्याची क्षमता समाजात निर्माण करणे, समाजाला मार्गदर्शन व सहकार्य करून राष्ट्रीय प्रवाहात आणणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी दक्षिण भारत जैन सभेचा कार्यविस्तार व सभासद संख्या वाढवण्याचे निश्चित केले आहे. दिगंबर जैन समाजातील सर्व पोटजातींनी सभेचे सभासद व्हावे. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या तरुणांनी आजीव सभासद होऊन आपले योगदान द्यावे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT