तीव्र प्रकाश रात्री, जीव अधांतरी
वाहनांवर प्रादेशिक परिवहन, शहर वाहतूक नियंत्रणकडून हवी कारवाई
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ : रात्रीच्या वेळी वाहन चालवताना समोरील रस्ता सुस्पष्ट दिसावा. याकरिता प्रखर प्रकाशाचे पांढरे दिव्यांचा दुचाकी- चारचाकी वाहनांत सर्रास वापर सुरू आहे. काही वाहनांमध्ये अवैधरीत्या अतिप्रखर लाईट लावल्याने समोरून येणाऱ्या वाहनचालकांना अक्षरशः काही क्षण दिसत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
पूर्वी दुचाकी चारचाकी वाहनांना कमी तीव्रतेचे बल्ब हेडलाईटमध्ये बसविलेले असत. मात्र, आता चांगल दृश्य आणि आकर्षक वाहन दिसण्यासाठी अक्षरशः रोषणाई केली जाते. नियमांचे पालन करून कंपन्या असे दिवे लावतात. त्यात अप्पर आणि डिप्पर असे कमी अधिक तीव्रतेचे एलईडी दिवे वापरलेले असतात. मात्र, त्यापेक्षा अधिक तीव्र लाईटचा हट्ट वाहनधारकांकडून केला जात आहे. त्यामुळे तीव्र फोकस असलेल्या व्हाईट लाईट अर्थात पांढऱ्या प्रकाशाची अतिरिक्त दिवेही लावले आहेत; पण हे दिवे अपघात आणि डोळ्यावर परिणाम करणारे आहेत. या दिव्यांमुळे समोर येणाऱ्या वाहनधारकांच्या डोळ्यापुढे काही क्षण अंधारी येते. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटते आणि अपघात घडत आहेत. चालत जाणाऱ्या पादचाऱ्यांच्याही डोळ्यावर असला प्रकाश पडल्यास त्यांना काहीतरी चमकल्यासारखे आणि काहीक्षण अंधारी येते. असा प्रकाश वारंवार पडल्यावर डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. अशा अवैध तीव्र लाईटचा वापर करून फिरणाऱ्या चारचाकी सध्या कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात आहेत. यावर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आणि शहर वाहतूक शाखेने ही कारवाईचा बडगा उगारला पाहिजे. अशी कळस गाठलेली बिनधास्त वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनाच्या डिलरकडून मिळालेल्या वाहनात रंग, आरसे, वाहनांच्या मागील पुढील दिव्यात, वाहनाच्या लांबी रुंदीत बदल करणे म्हणजे मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन आहे. असे लाईट देताना कंपनीने विचार करायला हवा. यासह अशा वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयासह शहर वाहतूक नियंत्रण शाखेनेही कारवाईचा बडगा उगारावा, अशी अपेक्षा नागरिकांतून होत आहे.
____________
असा पडतो वाहनांचा प्रकाश
वाहनांचे मूळ लाईट मॅग्नेटवर असतात. त्यामुळे वेग कमी जास्त केला तर त्या प्रकाशाची तीव्रता कमी जास्त होते. आज मात्र, रात्री स्पष्ट दिसण्यासाठी प्रखर लाईट हवा म्हणून वाहनांमध्ये बॅटरीवरील दिव्यांची सुविधा केली आहे. कमी जास्त वेगाचा काहीच परिणाम होत नाही. ती एकसारखी डोळे दिपवणाऱ्या स्वरूपात लागून राहतात. प्रकाश लुमेन्स लाइटवर असतो. लुमेन्स हे प्रकाश मोजण्याचे प्रमाण आहे. नव्या वाहनांचा ३००० पेक्षा अधिक लुमेन्स आहेत, तर पूर्वीच्या वाहनांचे लुमेन्स हे १०० ते ३००० पर्यंत आहेत. यावरून वाहनांतून रात्री पडणाऱ्या प्रकाशाची प्रखर तीव्रता किती असेल यांचा अंदाज येईल.
----------
कोट
वाहन कोणतेही असो त्यात अनधिकृत बदल करणे म्हणजे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन आहे. यात जादा तीव्रतेचे प्रखर असे दिवे वाहनाला बसवणे हाही उल्लंघनाचा प्रकार आहे. असे बदल वाहन नोंदणीनंतर केले जातात. याचा समोरील वाहनचालकांसह पादचाऱ्यांना त्रास होतो. त्यामुळे असे प्रकाश योजनेत बदल केलेले वाहन तपासणीत आढळल्यास त्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल.
- सचिन सावदेकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.